बुद्धिबळ खेळात प्रज्ञानंदनकडून कार्लसन दुसऱ्यांदा पराभूत
१६ वर्षाच्या भारतीय प्रग्नानंधाचा डंका! जगातील नंबर वन बुद्धिबळपटूचा केला दुसऱ्यांदा पराभव
24 मराठी न्यूज
बुद्धिबळ खेळातील भारतीय ग्रँडमास्टर म्हणून ओळखला जाणारा आर. प्रग्नानंधाने १६ खेळाडूंच्या चेसबल्स मास्टर्स ऑनलाईन जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीत जागतिक चॅम्पियन ठरलेल्या मॅग्नस कार्लसनचा दुसऱ्यांदा पराभव केला आहे. कार्लसनने डावामध्ये त्याच्या ४०व्या चालीवर मोठी चूक केली. या चुकीचा फायदा घेत प्रग्नानंधाने कार्लसनला पराभूत करण्यात यश मिळवले
. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये झालेल्या एयरथिंग्स मास्टर्स ऑनलाईन रॅपिड शतरंज टूर्नामेंटमध्ये कार्लसनला प्रग्नानंधाने पराभूत करत अप्रतिम अशी कामगिरी करून दाखवली होती.चेसबल्स मास्टर्स ही १६ खेळाडूंची ऑनलाईन जलद बुद्धिबळ स्पर्धा आहे. कार्लसन आणि प्रग्नानंधाचा डाव ड्रॉ कडे जात होती. मात्र कार्लसनने त्याच्या 40व्या चालीवर मोठी चूक केली. प्रग्नानंधाने या चुकीचा फायदा घेत कार्लसनला पराभूत केले. भारताचा युवा ग्रँडमास्टर प्रग्नानंधाने जगातील नंबर वन बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनचा पराभव करून इतिहास रचला आहे.चेसबल्स मास्टर्स स्पर्धेबद्दल सांगायचे झाले तर, या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसानंतर कार्लसन १५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर प्रग्नानंधा १२ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. चीनचा वेई १८ गुणांसह अव्वल, तर डेव्हिड अँटन १५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१