विशेष

साईबाबा चरणी ३३ लाखाचा हिरेजडित सुवर्ण मुकुट अर्पण केला.

२४ मराठी न्यूज

शिर्डी, साई भक्तीचा महिमा हा अजरामर आहे, साईबाबांची विलक्षण अनुभूती ही भाविकांना येत असते. त्याच अनुभूतीतून हैदराबाद येथील एका भाविकांने आपल्या स्वर्गीवासी पत्नीची इच्छापूर्ती करण्यासाठी साई चरणी सुमारे 33 लाख रुपये किमतीचा तब्बल ७०७ ग्रॅम हिरेजडित सुवर्ण मुकुट अर्पण केला आहे

सरकारचा खुलासा हैदराबाद येथील मंडा रामकृष्ण यांनी हा रत्नजडीत सुवर्ण मुकुट साई चरणी अर्पण केला. साई संस्थानच्या वतीने हे दान मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी स्वीकारले. साईबाबांना शुक्रवारी दान स्वरुपात मिळालेला हा मुकूट अतिशय आकर्षक आहे. मुकुटावर रत्नांचा साज चढवण्यात आला आहे, ओम या नावाची छबी रेखाटण्यात आली आहे. तर मुकूटाच्या वरच्या भागाला मोरपिसाने सजवण्यात आलं आहे. हा मुकूट दानशूर भाविकाच्या इच्छेनुसार आज माध्यान्ह आरतीदरम्यान मूर्तीवर चढवण्यात आला.साईभक्त डॉ. रामकृष्ण यावेळी सांगतात की, सन 1992 मध्ये ते शिर्डीला साईबाबा दर्शनसाठी सपत्नीक आले होते. यावेळी आरतीदरम्यान मुकूट चढवत असल्याचं त्यांची पत्नी रत्नाम्मा यांनी पाहिले. तेव्हाच त्यांनी बाबांना असाच सोन्याचा मुकूट चढवण्याची इच्छा व्यक्त केली होती.

परिस्थिती अभावी तेव्हा ते शक्य झालं नाही. दरम्यानच्या काळात रत्नाम्मा यांचं निधन झालं. मात्र पत्नीची शेवटची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यावेळी पैसे जमवण्यासाठी डॉ रामकृष्णा यांनी अमेरिकेत काम सुरु केलं. पैशाची पुर्तता करुन ते भारतात आले आणि हैदराबाद येथे बाबांसाठी सोन्याचा मुकूट तयार करुन घेतला.

🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!