द्रौपदी मुर्मू विजयी ! शिक्षिका, नगरसेवक, आमदार, मंत्री, राज्यपाल आणि आता राष्ट्रपती ! असा होता द्रौपदी मुर्मू यांचा प्रवास
२४ मराठी न्यूज
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. भाजप प्रणित एनडीएतर्फे द्रौपदी मुर्मू व विरोधी पक्षांच्यावतीने यशवंत सिन्हा हे दोन उमेदवार मैदानात होते. एनडीएचे घटक पक्ष व अन्य प्रादेशिक पक्षांनी दिलेला पाठिंबा लक्षात घेता या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचेच पारडे जड होते म्हणूनच त्यांचा विजय सोपा झाला आणि यशवंत सिन्हा पराभूत झाले. द्रौपदी मुर्मू यांना 812 मतं तर यशवंत सिन्हा यांना 521 मतं मिळाली आहेत. या निवडणुकांसाठी सोमवारी, 18 जुलै रोजी मतदान झाले होते
द्रौपदी मुर्मू यांचा प्रवासद्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहे. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्या राजकारणात आल्या. 1997 मध्ये मुर्मू या रायनगरपूर नगर पंचायतमधून नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या. पुढे 2000 आणि 2009 मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या.नंतर त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या.
बिजू जनता दल आणि भाजपच्या सरकारमध्ये त्यांनी वाणिज्य आणि वाहतूक अशा महत्वाच्या खात्यांचा पदभार पाहिला. त्यानंतर त्या मत्स्य विभागाच्या मंत्री होत्या. 2015 मध्ये मुर्मू या झारखंडच्या पहिल्या राज्यपाल होत्या. यादरम्यान त्यांनी राज्यपाल पदाला साजेल असे काम करत आदिवासी समाजाला न्याय देण्याचे काम केले.मुर्मू यांची निवड अभिमानास्पद असल्याचे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी जाहीर केले आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील 99 टक्क्यांहून अधिक मतदान झाले. गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, मिझोराम, पुडुचेरी, सिक्कीम, तामिळनाडूमध्ये या निवडणुकीसाठी 100 टक्के मतदान झालेप
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७