पान विक्रेत्याच्या मुलाने भारताला मिळवून दिले पहिले पदक, राष्ट्रकुल स्पर्धेत जिंकले रौप्य
वडिलाची पानटपरी... महाविद्यालयाने दत्तक घेतले... संकेत सरगरने राष्ट्रकूल स्पर्धेत इतिहास घडवला
२४ मराठी न्यूज
संकेतने २०१७ पासूनच राष्ट्रकुल स्पर्धेची तयारी सुरू केली होती. यादरम्यान सुनील प्रशिक्षक मयूरसोबत दिवसातून सात तास सराव करायचा. यानंतर त्याची राष्ट्रीय शिबिरासाठी निवड झाली. त्यानंतर मुख्य प्रशिक्षक विजय शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने तयारी केली.नवी दिल्ली – वडिलांसोबत पान विकणाऱ्या संकेत सरगरने राष्ट्रकुल स्पर्धेत देशाला पहिले पदक मिळवून दिले आहे. वेटलिफ्टिंगच्या ५५ किलो वजनी गटात त्याने रौप्य पदक जिंकले. संकेतचे वडील महादेव सरगर हे महाराष्ट्रातील सांगलीच्या मुख्य बाजारपेठेत पान आणि चहाचे दुकान चालवतात
. त्यांच्या या कामात संकेत सुद्धा मदत करतो.सांगली जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुनील नाईक यांनी सांगितले की, संकेत २०१३ पासून वेटलिफ्टिंग करत आहे. तो जिल्हा प्रशिक्षक मयूर सिंहासने यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे. संकेतचे वडील सांगली शहरातील मुख्य चौकात चहा आणि पानाची छोटी टपरी चालवतात. संकेतला दोन भाऊ आणि एक बहीण आहे. त्याच्या धाकट्या बहिणीनेही काजल सरगरने खेलो इंडिया कॉमनवेल्थ गेम्समध्ये महाराष्ट्रासाठी सुवर्णपदक पटकावले आहे.सुनील नाईक म्हणाले की, संकेतने २०१७ पासूनच राष्ट्रकुल स्पर्धेची तयारी सुरू केली होती. यादरम्यान सुनील प्रशिक्षक मयूरसोबत दिवसातून सात तास सराव करायचा. यानंतर त्याची राष्ट्रीय शिबिरासाठी निवड झाली. त्यानंतर मुख्य प्रशिक्षक विजय शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने तयारी केली. संकेतने गतवर्षी वर्ल्ड चॅम्पियनमध्येही देशासाठी रौप्य पदक जिंकले आहे.संकेतला बर्मिंगहॅममध्ये सुवर्णपदकाची आशा होती. प्रशिक्षक मयूरने सांगितले की, त्याला सुवर्णाची आशा होती. २४८ किलो वजन उचलून तो जेव्हा टॉपवर चालत होता तेव्हा सोन्याची आशा पूर्ण होताना दिसत होती, पण अंतिम वजन उचलताना त्याच्या हाताला दुखापत झाली. प्रशिक्षकाने दिव्य मराठीला सांगितले की, त्याला गंभीर दुखापत होऊ नये म्हणून आम्ही देवाकडे प्रार्थना करतो. वडील महादेव सरगर यांनीही आम्हाला मुलाच्या दुखापतीची चिंता असल्याचे सांगितले. मुलाने पदक जिंकून आमचे नाव कमावले आहे
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶