पुण्यातील सांगवी मधून सीमेवरील जवानांसाठी दोन हजार राख्या रवाना.
सांगवी, छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कै.सौ. शकुंतलाबाई आनंदराव शितोळे प्राथमिक विद्यामंदिर, नूतन माध्यमिक विद्यालय, शिशुविहारातील विद्यार्थ्यांनी सीमेवरील जवानांसाठी दोन हजार राख्या तयार केल्या आहेत. या राख्यांचे बॉक्स “24 मराठा लाईट इन्फंट्री’च्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.
यावेळी 24 मराठा लाईट इन्फंट्री औंध कॅम्पचे कॅप्टन हरिओम कुमार यांनी “कारगिल विजय दिन’ कार्यक्रमात या राख्यांच्या बॉक्स स्वीकारले. या राख्या सीमवेरील जवानांकरिता पाठविण्यात येणार आहेत.यावेळी संस्थेचे सचिव तुळशीराम नवले, बार्टीचे कर्मचारी संगीता शहादे, कुलकर्णी, मुख्याध्यापक शिवाजी माने आदी मान्यवर उपस्थित होते.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७