क्रीडा

योगासन स्पर्धेत एमआयटी गुरुकुल स्कूल मुलांचा दणदणीत विजय

प्रतिनिधी – नंदकुमार देशपांडे

पंढरपूर : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने एमआयटी गुरुकुल स्कूल, पंढरपूर येथे आयोजित केलेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत एमआयटी गुरुकुल स्कूलचा दणदणीत विजय झाला.संघातील मुलांची नावे : १४ वर्षाखालील मुले- शंभुराजे गवळी प्रथम क्रमांक, मयुरेश पवार तृतीय क्रमांक, राजवीर डोंगरे पाचवा क्रमांक.१७ वर्षाखालील मुली- वाणीश्री अमोल घाडगे तृतीय क्रमांक १७ वर्षाखालील मुले- शौर्य चौगुले द्वितीय क्रमांक१९ वर्षाखालील मुली- सिद्धी अनुप सावंत द्वितीय क्रमांक, ईश्वरी गाढवे तृतीय क्रमांक. दीक्षा जाधव चौथा क्रमांक ,१९ वर्षाखालील मुले- मुस्तफा जमादार पाचवा क्रमांक.रिदमिक योगामध्ये १४ वर्षाखालील मुले- शंभुराजे गवळी प्रथम क्रमांक, १७ वर्षाखालील मुले- शौर्य चौगुले प्रथम क्रमांक, १७ वर्षाखालील मुली- धैर्या बेद्रे द्वितीय क्रमांक, वाणीश्री घाडगे तृतीय क्रमांक, १९ वर्षाखालील मुली- ईश्वरी गाढवे तृतीय क्रमांक, १९ वर्षाखालील मुले- मुस्तफा जमादार प्रथम क्रमांक. विजयी विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक पल्लवी पाटील कविता कटारिया आणि भूषण तायडे यांचे मार्गदर्शन लाभले शाळेचे प्राचार्य शिवाजी गवळी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!