स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या कार्याध्यक्षपदी डॉ. दत्तात्रय काळेल यांची नियुक्ती.
माढा: महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी प्रा. डॉ. दत्तात्रय काळेल यांचीनुकतीच धाराशिव येथे झालेल्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष मा. डॉ.बापूसाहेब अडसूळ, धाराशिव येथील भोसले हायस्कूलचे संस्थापक अध्यक्ष मा. सुधीर अण्णा पाटील , महाराष्ट्र कुणबी मराठा संघटनेचे अध्यक्ष मा. एडवोकेट मा.तुकारामजी शिंदे, प्रदेश प्रवक्ते मा.संजयकुमार घोडके प्रदेश सचिव मा.गंगाधर पडनोरे धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख मा.गणेश नावडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. या संघटनेचे कार्य महाराष्ट्रातील अनुदानित व विनाअनुदानित शिक्षकांचे व कर्मचाऱ्यांचे प्रश्न तळमळीने शासन दरबारी मांडणे व मागण्या मान्य करून घेणे व शिक्षकांवरील व कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करणे हा या संघटनेचा प्रमुख हेतू आहे. या संघटनेच्या कार्याला साजेल असे कार्य डॉ.दत्तात्रेय काळेल यांचे असल्यामुळेच त्यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार ही मिळालेले आहेत व विविध सामाजिक संस्थेच्या पदावरती कार्यरत आहेत.या त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. डॉ. दत्तात्रय काळेल हे मूळचे खिलारवाडी ता.सांगोला येथील असून सध्या ते रयत शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय माढा येथे राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख म्हणून व राष्ट्रीय सेवा योजनेचे चेअरमन म्हणून कार्यरत आहेत.