संपादकीय

पत्रकारांच्या प्रश्नावर तडजोड नाही-रामचंद्र सरवदे आक्रमक भूमिकेत

पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार

२४’ मराठी न्यूज सोलापूर जिल्हा प्रतिनिधी श्री प्रकाश इंगोले

पत्रकार सुरक्षा समिती वतीने राज्यातील पत्रकारांसाठी गेली अनेक वर्षापासून प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांच्या कुटुंबातील इतर सदस्यांकरिता विमा योजना स्वतः च्या मालकीची पक्की व हक्काची घरे नसलेल्या पत्रकारांसाठी घरकुल योजना यादीवर नसलेल्या राज्यातील सर्वच वृतपत्राना पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती खंडणी व सरकारी कामात अडथळा आणला म्हणून राज्यातील ज्या पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी नेमणे राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे राज्यातील सर्वच युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता त्याच बरोबर कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांच्या वारसाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत इत्यादी पत्रकारांच्या जिव्हाळ्या च्या विषयावर पत्रकार सुरक्षा समिती वेळोवेळी आंदोलन उपोषण निवेदन करत असून राज्यसरकार ला पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ नाही का? असा खोचक प्रश्न पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांनी राज्यसरकार ला विचारला असून पत्रकार सुरक्षा समिती ने आजपर्यंत दिलेल्या निवेदनाची राज्याच्या राज्यपाल महोदयांनी तात्काळ दखल घेऊन राज्यातील पत्रकारांचे प्रश्न जाणून घ्यावेत अशी मागणी देखील लावून धरली असून राज्याचे राज्यपाल यांनी राज्यातील पत्रकारांचे प्रश्न दिवसेंदिवस जटील व गंभीर होत असल्यामुळे राज्यपाल यांनी जातीने लक्ष घालण्याची मागणी देखील केली असून आता राज्य सरकार ने राज्यातील पत्रकारांच्या बाबतीत गंभीर होण्याची गरज असून राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नाबाबत आपण यापुढे आक्रमक भूमिका घेणार असल्याचे सांगत पत्रकारांच्या प्रश्नाबाबत तडजोड करणार नसल्याचं म्हटलं आहे राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नाबाबत मा राज्यपाल महोदय यांची राजभवन मुबंई येथे लवकरच भेट घेणार असून राज्यातील पत्रकारांच्या गंभीर प्रश्ना बाबत आपण तडजोड करणार नसल्याची परखड मत *पत्रकार सुरक्षा समिती चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना व्यक्त केलं आहे*

🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!