संपादक
भारतात विविध प्रांतांत विविध नावांनी वेगवेगळ्या प्रकारे मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो. राजस्थान, गुजरातमध्ये हा दिवस पतंगाचा दिवस म्हणून साजरा होतो. वाद, कटू घटना मागे टाकून नात्यात पुन्हा गोडवा निर्माण करूया, असा गोड संदेश हा सण देतो.
संक्रांत म्हणजे संक्रमण करणारा म्हणजे वाढ करीत जाणारा वर्धिष्णू सण! या दिवसापासून दिवस वाढत जातो. रात्र कमी होते. वातावरणातील थंडावा कमी होऊन उष्मा वाढत जातो. सूर्याचा मकर राशीत होणार्या आगमनाचा पहिला दिवस म्हणजे संक्रांत होय! आशिया खंडात हा संक्रांतीचा सण बहुतांश देशांत साजरा केला जातो. नेपाळमध्ये तो ‘माधी’ या नावाने, थायलंडमध्ये ‘सोंक्रांत’, तर म्यानमारमध्ये ‘थिंगयान’ या नावाने हा सण साजरा करतात.
भारतात विविध प्रांतांत विविध नावांनी वेगळ्या प्रकाराने हा सण साजरा केला जातो. केरळमध्ये ‘पोंगल’, पंजाबमध्ये ‘लोहरी’ अशी या सणाची नावे आहेत. राजस्थान, गुजरातमध्ये हा दिवस पतंगाचा दिवस म्हणून साजरा होतो. या दिवशी गुजरात, राजस्थानमध्ये पतंग उडवण्याच्या कार्यक्रमांचे विशेष आयोजन केले जाते.
या दिवसाला आध्यात्मिक आणि वैज्ञानिक अशा दोन कारणांमुळे महत्त्व आहे. वैज्ञानिक कारण म्हणजे, या दिवसानंतर रात्र लहान होऊ लागते आणि दिवस मोठा होऊ लागतो. थंडीचा जोर पूर्णपणे नसला, तरी थोड्या प्रमाणात कमी होऊ लागतो. हवामान कोरडे असते. अशा वेळी तीळ आणि गूळ यांचा आहारात समावेश करणे हा आरोग्य सल्ला अतिशय गुणकारक ठरतो.
तिळाचा स्निग्धपणा आणि गुळाचा उष्णपणा याचे परिणाम तब्येतीसाठी उत्तम! तसेही आपल्याकडे ऋतुमानानुसार सणांचे, देवांचे प्रसाद असतात. म्हणूनच संक्रांतीला तिळगुळाचे लाडू, वड्या, गूळपोळ्या हा प्रमुख पदार्थ असतो. या दिवसातले वारे संक्रांतीचे वारे म्हणून प्रसिद्ध आहेत. या वार्यांवर अनेक मराठी कविता, भावगीते बेतलेली आहेत. हीच वार्याची अनुकूलता पतंग उडविण्यासाठी योग्य असते आणि म्हणूनच पतंगाचा खेळ या दिवसात खेळला जातो. नववर्षाची सुरुवात अशा आनंददायक सणाने होत
24 मराठी न्यूज
संपादक लखन साळुंखे