संतांच्या अभंगांना सिनेमाच्या चाली लावणे ही विकृती होय – कवी संतोष पवार.
कवी संतोष पवार आपल्या कवितांचे सादरीकरण करताना यावेळी मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ चंद्रकांत खिलारे, उपप्राचार्य डॉ चांगदेव कांबळे व इतर
24 मराठी न्यूज पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर – “सर घातला गळ्यात, त्याचे झाले सासर…. नथ नाकातली झाली, हिरव्या पेंढीचं गाजर पायातल्या जोडव्यानं म्हनं, बाईचा रुबाब वाढतो”अशा शब्दात सासरवासीन स्त्रीचे चित्रण कवी संतोष पवार यांनी केले. सध्या अभंगांच्या जुन्या चाली बदलून त्यांना नवीन चाली लावण्याचा चाललेला प्रकार ओंगळवाणा असून भक्ती संगीतात निर्माण झालेली ही विकृती आहे. भक्ती संगीत संतांनी निर्माण केले आणि त्यांना चाली लावल्या. अनेक गायकांनी हे अभंग लोकांच्या घराघरात आणि मनामनात पोहचविले. मात्र अलीकडच्या काळातील कांही कीर्तनकार प्रसिद्धीच्या हव्यासापोटी या अभंगांना चित्रपटाच्या चाली लावत आहेत. त्यामुळे त्यातील पावित्र्याची भावना लुप्त होते की काय अशी शंकाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटीलस्वायत्त महाविद्यालयात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त ‘मराठी विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘काव्यसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे हे होते. कवी संतोष पवार पुढे म्हणाले की, “कवितेची रचना हीजाणीवपूर्वक होत नाही. कवितेत अलंकार आणि उपमेचे प्रकार वापरले जातात. सध्या कृत्रिम बुध्दिमत्ता वापरून अनेक क्षेत्रात कार्य केले जाते. या कृत्रिम बुद्धीमत्तेने कवितेच्या क्षेत्रात हवी तशी निर्मिती होवू शकणार नाही. कविता ही भावनाशील असते. कवी हा निर्माता असतो. मानवी बुध्दिमत्ता वापरून निर्माण झालेली कविता हिच प्रभावी असते. ” यावेळी त्यांनी अनेक सामाजिक कवितांचे सादरीकरण केले. ‘गावात पोर पाण्याला गेली, वाटेत गुंडाटाकून आली. धुळवडीचा दिवस होता, रंगाने पोर माखून गेली.’ या त्यांच्या कवितेने श्रोत्यांची मने भरून आली. तर ‘बैल’ या त्यांच्या कवितेला श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या ‘कविसंमेलनात श्रेया खुळे,प्राजक्ता लोकरे, गणराज काटकर, श्रुती चव्हाण या विद्यार्थ्यांनीकवितांचे सादरीकरण केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारेम्हणाले की, “सामाजिक परिवर्तनासाठी साहित्यिक आणि कलाकार आपणास पुन्हा पुन्हा सांगत राहतात. त्यांच्याकडे असणारी प्रतिभा ही विशेष असते. म्हणून त्यांना समाजात किंमत असते. विद्यार्थ्यांनी स्वत:मधील कौशल्ये विकसित करावीत. कलेचा शोध घेवून त्याचा विकास करावा. आपले कधीही बोनसाय होवू देवू नये. बोनसाय दिसायला जरी बरे वाटले तरी ते फळ, फुल आणि सावली देवू शकत नाही. याचा विचार करून विद्यार्थ्यांनी स्वत:ला विशाल बनवावे. त्यासाठी खूप वाचन करावे. खूप लिहावे. थोरामोठ्यांच्या कहाण्यावाचाव्यात. विद्यार्थ्यांनी कविता समजावून घ्यावी. रिमिक्स ही तात्कालिक बाब असून त्यामुळे गीताच्या आणि संगीताच्या सौदर्यात विकृती निर्माणहोते.” या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कला विभागाचे अधिष्ठाता, मराठी विभाग प्रमुख उपप्राचार्य डॉ. चांगदेव कांबळे यांनी केले. तर प्रमुख पाहुण्याचा परिचय डॉ. राजाराम राठोड यांनी करून दिला. या कार्यक्रमास कार्यालयीन प्रमुख प्रभाकर पारधी, प्रा. डॉ. बाळासाहेब बळवंत, प्रा. डॉ. फैमिदा बिजापुरे, प्रा. सुमन केंद्रे, डॉ. दत्तात्रय काळेल, प्रा. डॉ. भारती सुडके, प्रा. सीताराम सावंत, प्रा. शुभांगी भंडारे, सौ. प्रणाली पवार, प्रा. वर्षा नाईकनवरे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमास विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. दत्ता डांगे, डॉ. रमेश शिंदे, सुरेश मोहिते, अभिजित जाधव, ओंकार नेहतराव, अमोल माने यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचेसूत्रसंचालन प्रा. सारिका भांगे यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभारप्रा. म्हाळाप्पा कांबळे यांनी मानले……………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७