राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त पंढरपूर शहर काँग्रेस कमिटी मार्फत अभिवादन करण्यात आले.
24 मराठी न्यूज पंढरपूर, प्रतिनिधी
राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त पंढरपूर शहर काँग्रेस कमिटी मार्फत अभिवादन करण्यात आले.शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने देशाचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची ३१ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.स्टेशन रोड येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. राजीव गांधी अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याचे चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अभिजीत पाटील यांनी उपस्थित राहून स्व. राजीव गांधी यांना अभिवादन केले. पंढरपूर मर्चंटस् बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनंजय पवार, जिल्हा उपाध्यक्ष सुहास भाळवणकर, जेष्ठ नेते दाजी बागल, काँग्रेसचे शहराध्यक्ष अमर सुर्यवंशी, काँग्रेस पंढरपूर शहराध्यक्ष संदीप शिंदे सेवादल अध्यक्ष गणेश माने, मिलिंद अढवळकर, नागनाथ अधटराव, देवानंद इरकल, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते कार्यकर्ते उपस्थित होते.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com