सामाजिक

नरेंद्र मोदी आणि पंकजा मुंडे यांच्यासाठी बीडमधून अनवाणी पंढरीची पायी वारी सात दिवसाच्या प्रवासाने रविवारी घेतले विठ्ठलाचे पददर्शन

पंढरपूर /प्रतिनिधी

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत. तसेच बीडच्या नेत्या पंकजाताई मुंडे या खासदारपदी निवडून याव्यात यासाठी बीड येथील रामभक्त यांची मागील सात दिवसाची अनवाणी पायी वारी रविवारी २मे पंढरीत पोहचली आहे. पंढरीत येताच त्यांनी चंद्रभागेत स्नान करून, विठ्ठलाचे पददर्शन घेतले आहे. यावेळी विठ्ठलाला वरील साकडे घालण्यात आले. बीड जिल्ह्यातील महाजनवाडी येथील रामभक्त विष्णू महाराज सुरवसे यांनी विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी ही अनवाणी पायीवारी पूर्ण केली आहे. या पायी वारीत सुरवसे महाराज यांनी जातेगाव, जोतिबाची वाडी, पाथरुड , वालवड, सामनगाव, परांडा, कुर्डूवाडी, लऊळ, अरण, आष्टी, रोपळे, आढीव, विसावा मार्गे पंढरपूर येथील चंद्रभागा वाळवंटामध्ये येऊन विसावा घेतला आहे. त्याठिकाणी येवून प्रथम पवित्र पावन आशा चंद्रभागेचे स्नान करून भक्त पुंडलिकाचे प्रथम दर्शन घेतले. त्यानंतर प्रदक्षिणा करून विठ्ठलाचे पददर्शन घेऊन, देशाच्या पंतप्रधानपदासाठी मोदी यांना तिसऱ्यांदा संधी मिळावी आणि बीडच्या नेत्या पंकजाताई मुंडे याही खासदार पदी विजयी व्हाव्यात, अशी मनोभावे प्रार्थना करून श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी विजयाचे साकडे घातले आहे. यापूर्वीही देखील २०१४ च्या निवडणुकीनंतरही अशाच प्रकारे या सुरवसे महाराज यांनी सायकल वारी पूर्ण करत विठ्ठलाच्या चरणी साकडे घातले होते. तसेच २०१९ च्या निवडणुकीतही त्यांनी अनवाणी पायीवारी पूर्ण करीत श्री विठ्ठलचरणी साकडे घातले होते.त्यावेळेस त्यांना आपली वारी पंढरीच्या पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादाने सफल झाली होती.. त्याचा आपल्याला त्यावेळी अतिशय आत्माआनंद मिळाला होता. त्याच पद्धतीचा आत्मानंद यावेळीही मिळेल, अशी सदिच्छा रामभक्त विष्णू महाराज सुरवसे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली आहे. चौकट*श्री रामनवमी पासून केले होते चप्पल व्रत्त*रामभक्त विष्णू महाराज सुरवसे यांनी लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागल्यापासून म्हणजेच श्री राम नवमीपासून आपल्या पायात चप्पल न घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेताच व पंकजाताई विजयी झाल्यानंतर आपण आपल्या पायात चप्पल घालणार असल्याचेही सुरवसे महाराज यांनी सांगितले आहे. फोटो विष्णू महाराज सुरवसे बीड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!