आरोग्य

पंढरपूर मध्ये दि. ०५ जून पासून ‘सिध्द समाधी योग’ या शिबीराचे आयोजन

पंढरपूर प्रतिनिधी

टीम एस.एस.वाय.चा उपक्रम पंढरपूर- ‘येत्या बुधवार, दि.०५ जून, २०२४ पासून दि. १४ जून, २०२४ पर्यंत पंढरपूर रेल्वे लाईन लगत असलेल्या द.ह.कवठेकर हायस्कूल मध्ये एस.एस.वाय. अर्थात ‘सिध्द समाधी योग” या शिबीराचे आयोजन केले असून योग ब्रह्मा ऋषि प्रभाकर यांनी तयार केलेल्या आराखडा व संहितेनुसार या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरा द्वारे ‘आनंदी जीवन जगण्यासाठी परिपूर्ण मार्ग’ मिळणार आहे,’ अशी माहिती जेष्ठ प्रशिक्षक संतोष गुरुजी यांनी दिली

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात माणसाचे मानसिक व शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ब्लड प्रेशर, डायबेटिस, हृदयविकार, संधीवात, दमा, थाईराईड , निद्रानाश, बेचैनी इ.समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आरोग्य सुव्यवस्थित ठेवून मानसिक क्षमता वाढविल्यास मन प्रसन्न व शांत राहते आणि आपली एकाग्रता व स्मरण शक्ती वाढते. यासाठी ‘टीम एस.एस.वाय.’ पंढरपूर यांच्यातर्फे ‘सिध्द समाधी योग शिबीरा’ चे आयोजन केले आहे. वय १४ वर्षे पासून ते ८० वर्षापर्यंतचे सर्व नागरिक यामध्ये सहभागी होऊ शकतात. तरी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. योग ब्रह्मा ऋषि प्रभाकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या व त्यांच्या संहितेनुसार चालू असलेल्या संस्थेचे तज्ञ प्रशिक्षक श्री संतोष गुरुजी यांनी हे शिबीर आयोजिले आहे. सदरचे शिबिर म्हणजे ‘सायन्स ऑफ सायलेन्स योगा’ म्हणजे ‘आनंदी जीवन जगण्याचा सर्वोत्तम तथा परिपूर्ण मार्ग’ असे त्यांनी सांगितले आहे. सध्या आपल्या आयुष्यात भेडसावणारे सर्व प्रकारचे जे प्रश्न आहेत जसे की, लवकर थकवा येणे, रोजचे काम अधिक प्रभावशाली (स्मार्ट वर्क) कसे करावे? स्थिर, शांत व प्रसन्न मनाची गरज, जगण्यातील ताण तणावापासून मुक्तता , रक्तदाब (ब्लडप्रेशर), मधुमेह (डायबेटीस), हृदयविकार, संधीवात, दमा, थायरॉइड, ऍसिडीटी, आम्लपित, निराशा, निद्रानाश, द्विधा मनःस्थिती यासारखे विकार व मानसिक आजार दूर करणे, वाढते वजन कमी करणे, जीवन आनंदाने, भरभरुन व मनसोक्तपणे जगणे, त्यासाठी राजयोग, प्राणायम, प्रभावी ध्यान साधना (मेडिटेशन) आत्मसात करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपली एकाग्रता व स्मरणशक्ती वाढते अन् आपण आपल्या व्यवसायात पारंगत होवून आपण आपली सर्व स्वप्ने पूर्णत्वास नेवू शकतो. आपले कुटुंब, नातेवाईक, मित्र परिवार संपर्कातील जन समुदायाशी स्नेहपूर्ण नाते निर्माण करून ही नाती आपण जोपासू शकतो. यासाठी या शिबिराचे आयोजन केले आहे. ज्या साधकांना वर नमूद केल्याप्रमाणे यश प्राप्त करायचे आहे त्यांनी या ‘एस.एस.वाय.’ अर्थात ‘सिध्द समाधी योग’ शिबीरात सहभागी व्हावे. यातून मन व शरीर हे पंचकोश शुध्दीद्वारे शुध्द करण्याचे कार्य घडणार आहे. हे शिबिर दि. ०५ जून रोजी संध्याकाळी ०६.००वा. सर्वांसाठी खुले असेल तर दि. ०६ जून ते दि. १० जून पर्यंत सकाळी ०६ .०० ते ०९.०० वाजेपर्यंत आणि दि. ११ जून रोजी सकाळी ०७.०० ते सायं. ५.०० वाजेपर्यंत तर दि. १२ जून रोजी सकाळी ०९.०० ते १४ जून रोजी सायं. ०५.००पर्यंत निसर्गाच्या कुशीत ‘रिट्रिट’ होणार आहे. त्यानंतर दि. १६ जून रोजी सायंकाळी ६.०० वाजता ‘सिद्ध समाधी योग’ च्या माध्यमातून ‘फॅमिली डे’ साजरा होणार आहे. या शिबिराची तयारी अंतिम टप्यात आली असून हे शिबिर यशस्वी करण्यासाठी ‘टीम एस. एस.वाय.’ चे सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत. या शिबिरात सहभागी होण्यासाठी दादासाहेब रोंगे (मोबा.क्र. ८००७५५३०००), राहुल पटवर्धन (मोबा.क्र. ९८८१९३९०१०) व अरुण सरवदे (९४२२६५०५६३ ) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.छायाचित्र – योग ब्रह्मा ऋषि प्रभाकर.

*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!