शुद्ध हवा आयुष्याची गोळी वाढवणारे पर्यटन स्थळ सरकोली
पंढरपूर प्रतिनिधी – नंदकुमार देशपांडे
आज रविवार रोजी लहान मुले व आम्ही पर्यटन स्थळ निर्मितीचे सेवक मिळून फेवर ब्लाक श्रमदानातून काढून घेतले.ते सर्व ब्लाक पर्यटन स्थळावरील सुशोभीकरणात वापरण्यात येणार आहेत.या निसर्ग निर्मित सार्वजनिक कामात अंगातुन निघणारा घाम व आनंद शरीर शुद्ध करतो.मनाला अत्युत्तम आनंद निर्माण करतो.आपण ज्यावेळी घरच काम करतो त्यावेळी मनातील भाव स्वार्थी असतो.सार्वजनिक सेवेच्या कामातिल भाव निस्वार्थी असतो.नुसतच बिन कामाचे बसने हे नकारात्मक भाव आहे.पर्यटन स्थळ निर्मितीच्या कामात अनेक वेळा श्रमदात्यांच्या पायात काटे मोडले,हाता पायाला लागले.फोड आले, रक्त निघाले.तरीही आम्हाला याचा काहीही त्रास जाणवत नाही.कारण मनातला भाव निस्वार्थी, स्वच्छ आहे.आपणही फ्रेश, निरोगी, आनंदी राहण्यासाठी सरकोली पर्यटन स्थळावर किंवा आपणास जिथे सोईचे होईल तेथे आपल्या सवडीने निसर्गासाठी सेवा द्या.श्रमदान करा. आज नेहमी प्रमाणे शिवरत्न मार्टचे पिसे बंधू यांनी मुलांना प्रत्येकी दोन बिस्कीट पुडे दिले चहा दिला.आदरणीय माजी आमदार यशवंत तात्या माने यांनी सरकोली पर्यटन स्थळासाठी तिन कोटी रुपयांचा निधी दिला आहे.त्याचे नदी किनारी रस्त्याचे सुंदर काम चालू आहे.हा रस्ता मुंबईत समुद्र किनाऱ्यावर मरीन ड्राईव्ह एरियामध्ये जसा आहे.त्यापध्दतिने माण आणि भिमा नद्यांच्या किनाऱ्यावर होत आहे.तो पर्यटकांना आकर्षित करेल.गावकरी बंधू भगिनी यांना माॅरनिंग वाॅकसाठी,योगासनासाठी, व्यायामासाठी ,मुलांना अभ्यास करण्यासाठी उपयुक्त होईल.सरकोली ता पंढरपूर जि सोलापूर हे देश पातळीवरील पर्यटन स्थळ म्हणून पुढे येइल.सरकोली ता पंढरपूर पर्यटन स्थळ निर्मिती हा आमचा ध्यास आणि श्वास आहे.आपणही या मध्ये सहभागी व्हावे, सेवा द्यावी, मार्गदर्शन करावे.ही विनंती.सेवेकरीता बंधू विलास श्रीरंग भोसले मा पोलीस अंमलदार 9923433535.