स्वेरीच्या विद्यार्थ्यांचे ‘नॅशनल आंत्रप्रन्युअरशिप चॅलेंज’ मध्ये यश
२० विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) च्या स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ‘ई-सेल स्टुडन्ट टीम’ चे विद्यार्थी ‘नॅशनल आंत्रप्रन्युअरशिप चॅलेंज’ मध्ये सहभागी झाले होते. आयआयटी बॉम्बेने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामध्ये स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या वीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या यशामुळे त्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम. एम. पवार यांच्या सहकार्याने या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना डॉ. हर्षवर्धन रोंगे यांचे मार्गदर्शन लाभले. स्वेरीच्या या विद्यार्थ्यांचे यश हे विशेष असे आहे कारण गोपाळपूर सारख्या ग्रामीण भागात असणाऱ्या स्वेरीतून शिक्षण घेऊन शहरी विद्यार्थ्यांबरोबर स्पर्धा करत असूनही त्यांनी यश संपादन केले आहे. खेळ असो व स्पर्धा, स्वेरीचे विद्यार्थी हे परिश्रम करतातच हे ‘नॅशनल आंत्रप्रनरशिप चॅलेंज’ या स्पर्धेत मिळालेल्या यशावरून समजते. स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेणाऱ्या समिक्षा खटावकर या विद्यार्थिनीच्या नेतृत्वाखाली सरस्वती शिंदे, माधवी स्वामी, सायली वाघमारे, सानिका बागल, समीक्षा गटकळ, शेलविका बोड्याल, संस्कृती बंडगर, प्रशांत गायकवाड, महेश घाडगे, आदित्य पाचोरे, प्रणव पवार, श्रीराम पतंगे, भूषण बागल, क्षितिजा उराडे, ऋतुजा बिचुकले, दिग्विजय बुर्रा, प्रज्वल मंठाळकर, चैतन्य सोनवणे व श्रीराम गजेंद्रगडकर या वीस विद्यार्थ्यांनी ‘नॅशनल आंत्रप्रन्युअरशिप चॅलेंज’मध्ये सहभाग घेतला आहे. सांघिक कामगिरी करत असताना या विद्यार्थ्यांनी प्राथमिक फेरीमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली. त्यामुळे स्वेरीच्या या टीमने देश पातळीवर सतरावा क्रमांक पटकावला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांची दि.३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान ‘आयआयटी बॉम्बे’ मध्ये होणाऱ्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. तसेच हे विद्यार्थी ‘आयआयटी बॉम्बे’ च्या ‘ई-समिट’ मध्ये देखील सहभागी होण्यासाठी पात्र ठरले आहेत. आंत्रप्रन्युअरशिप मुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढीस लागतो. त्यामुळे चांगले करिअर करण्यासाठी हातभार लागतो. त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकासात वाढ होते. स्वेरीमध्ये संशोधनात्मक कार्यशाळा होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना एक प्रकारची प्रेरणा मिळते. यासाठी ई-सेल टिम परिश्रम घेत आहे. या यशामुळे स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख, विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी अंतर्गत असलेल्या चारही महाविद्यालयांचे प्राचार्य, अभियांत्रिकीच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम. एम. पवार, संशोधन अधिष्ठाता डॉ.ए.पी.केने, इतर अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले आहे.
स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ‘ई-सेल स्टुडन्ट टीम’ ‘नॅशनलआंत्रप्रन्युअरशिप चॅलेंज’ मध्ये सहभागी झालेले विद्यार्थी सोबत स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, डॉ. हर्षवर्धन रोंगे, डॉ.ए.पी.केने व‘ई-सेल स्टुडन्ट टीम’मधील विद्यार्थी व विद्यार्थिनी.