पंढरपुरच्या श्रीविठ्ठल मंदिर संवर्धनाचे काम निकृष्ट दर्जाचे, पुरातन मजबुत मंदिराचा ढाचा खिळखिळा होतोय – गणेश अंकुशराव
पंढरपूर प्रतिनिधी – नंदकुमार देशपांडे
पंढरपूर येथील श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिराला पुरातन स्वरूप प्राप्त होण्यासाठी मंदिर संवर्धनाचे काम सध्या सुरू आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच खळबळजनक आरोप महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केला आहे.गणेश अंकुशराव यांनी मंदिरात जाऊन पाहणी केली असता नवीन काम केलेल्या बाजीराव पडसाळीतील महादेव (महालक्ष्मी) मंदिराच्या छताला गळती लागली असल्याचे दिसून आले. येथील दगडांचीही त्यांनी पाहणी केली असताना मंदिरातील जुनेच दगड पुन्हा पॉलिस करुन वापरले जात आहेत.नवीन बांधकाम करताना आधुनिक मशिनरी वापरल्या जाताहेत, या मशिन्स च्या हाद-यामुळे जुन्या मजबुत मंदिराचा ढाचा खिळखिळा होतोय. नवीन बांधकाम केलेल्या दगडांमध्ये मोठमोठ्या फटी पडलेल्या दिसत आहेत असे अनेक खळबळजनक आरोप अंकुशराव यांनी केले आहेत.मंदिरात शासनाचे अनेक मंत्री, अधिकारी दर्शनासाठी येतात, परंतु हे सर्वजण येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी करत नाहीत. देवाचे दर्शन घेतानाचे , सत्काराचे यांचे फोटो दिसतात परंतु मंदिराच्या कामाची पाहणी करतानाचे फोटो दिसत नाहीत.प्रशासकीय अधिकारी, मंदिर समिती सदस्य जाणुन बुजुन याकडे दुर्लक्ष करत आहेत असा महाराष्ट्राचा अध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या या मंदिराचे होणारे निकृष्ट दर्जाचे काम ही बाब गंभीर असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच याकडं आणि एकुणच मंदिर समितीच्या कारभाराकडे आता लक्ष घालणं गरजेचं आहे. असे मत गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केले आहे.