मंदिर समितीनेच मनुष्यबळ अर्थात अकुशल कुशल कामगार नेमावे
पंढरपूर – नंदकुमार देशपांडे
विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीकडे कुशल मनुष्यबळ कर्मचारी हे गरजेनुसार आवश्यकतेनुसार नेमण्याकरता विहित नमुन्यात निविदा प्रक्रिया राबवून ई टेंडर द्वारे निविदा मागवण्यात आल्या होत्या यामध्ये दहा ते बारा निविदातून मंदिर समितीच्या नियम अटी शर्ती नुसार रक्षक सिक्युरिटी प्रा लि पुणे या कंपनी ने मंदिर समितीच्या घातलेल्या अटीत बसल्यामुळे त्यांची निवेदन मंजूर करण्यात आली परंतु तेथील मनुष्यबळ रक्षक हे समितीच्या नियमाप्रमाणे अटी शर्ती प्रमाणे काम करत नसल्याने त्यांचा ठेका रद्द समितीने केला आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कुशल व कुशल कर्मचाऱ्यांची गरज असल्याने समितीने कर्मचारी नेमण्याचा विचार करून निविदा प्राप्त केल्या परंतु रक्षक सिक्युरिटी या कंपनीकडे जे मनुष्यबळ अर्थात रक्षक म्हणून पुरवण्यात आले ते कर्मचारी मंदिरामध्ये मंदिरात आलेल्या वृद्ध वयस्कर वारकरी भाविक यांना अरेरावीची भाषा उद्धटपणे वागणूक व निविदामध्ये दिलेल्या शर्तीचा भंग अधिकारावरून हा ठेका रद्द करण्यात आला तो करण्यापूर्वी या कंपनीला तोंडी वा लेखी सूचना देऊनही यांनी मंदिराकडे पाठवलेल्या मनुष्यबळामध्ये यांच्या वर्तनात सुधारणांना झाल्याने मंदिर समितीने मंदिर समितीने रक्षक सिक्युरिटी प्रा लि पुणे या कंपनीचा मनुष्यबळाचा ठेका रद्द केला आहे. मंदिर समिती आता सध्या मनुष्यबळाचा ठेका देण्याचा विचार करून कुशल व कुशल कर्मचारी घेण्यासंदर्भात निविदा काढण्याच्या विचारात आहे परंतु समितीने असे न करता प्रशासनातीलच परंतु ज्यांना डिसिप्लिन अर्थात शिस्त सौजन्य बोलण्यात मारदवता वयस्कर लोकांबद्दल आदरातील असे असलेले होमगार्ड की ज्या होमगार्डना ड्युटीचा वारीचा अनुभव असून त्यांच्याही हाताला काम मिळेल तसेच प्रशासनातील निवृत्त पोलीस कर्मचारी निवृत्त डिफेन्स मधील कर्मचारी यांना जर मंदिर समितीने रक्षक म्हणून घेतले तर समितीला याचा फायदाच होणार आहे. या लोकांना कामाचा अनुभव वृद्ध वारकरी नागरिक यांच्याशी कसे वागावे याचे भान व सौजन्यता असल्याने मंदिरात येणारा हा भाविक सामान्य पासून श्रीमंता पर्यंत तसेच कष्टकरी वर्ग आहे या सर्वांना एकच ध्यास असते की आपल्या परब्रम्ह अशा सावळ्या विठ्ठलाचे चरणस्पर्शाने दर्शन व्हावे परंतु दर्शनाला जाताना ह्या लोकांच्या मनात जो एक भक्तीचा भाव असतो एक ऊर्जा घेऊन जाण्यासाठी ते दर्शनाला आलेले असतात अशांना नेमके याच वेळी काही कर्मचारी हे वारकरी वृद्ध वयस्कर लोकांना अरेरावीची भाषा वापरून उद्धटपणे वर्तन करतात त्यामुळे दर्शणार्थी भाविकांचे मन तात्पुरते विषय होते परंतु मनामध्ये अंतरिक विठ्ठल दर्शनाची ओढ असून या सर्व प्रकाराकडे त्यावेळेस दुर्लक्ष करून आपल्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यात धन्यता म्हणतात नंतर मात्र ज्यांना हे सहन झाले नाही ते विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे ते तक्रारी करतात यातूनच या बाहेर आल्यानंतर केवळ ठराविक लोकांच्या अरीरावरीमुळे संपूर्ण विठ्ठल मंदिर व पंढरपूर बदनाम होत आहे याकरता मंदिरातील अधिकाऱ्यांनीही काळजीने लक्ष देणे गरजेचे आहे मंदिर समितीने कुशल कुशल कामगार मनुष्यबळाच्या ठेका न देता मंदिरात समितीने व न्याय विधी खात्याने वरील प्रमाणे लोकांची नियुक्ती केल्यास दर्शणार्थी वारकरी भाविक भक्त यांना विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी रांगेतून जाताना अशा ठराविक प्रेक्षकांच्या अरेरावीला सामोरे जावे लागणार नाही आजही मंदिरात काही समितीचे कर्मचारी हे आपण मंदिराचे मालक असल्यासारखे वागून अरेरावेची भाषा करतात याचा अनुभव दोन-तीन दिवसांपूर्वी प्रत्यक्ष दर्शनी सांगितलं आहे याकरता मंदिराचे बदनामी व भाविकांचा त्रास होणार नाही याकरता वरील लोकांचा कुशल व कुशल मनुष्यबळ म्हणून विचार होणे गरजेचे आहे अशी ही चर्चा मंदिर परिसरातील जमलेल्या भाविक नागरिक यांच्या बोलण्यातून जाणवत होती याकरता मंदिर समितीने वरील बाबीचा विचार करणे गरजेचे आहे