देश-विदेश

महाराष्ट्रातील 1200 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले; मदतीसाठी राज्य सरकारचे सर्वोतोपरी प्रयत्न, ‘या’ ठिकाणी साधू शकाल संपर्क

24 मराठी न्युज मुख्य संपादक श्री लखन साळुंखे

सध्या रशिया व युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून राज्यातील अंदाजे 1200 विद्यार्थ्यी युक्रेन देशात अडकले आहेत, त्यातील 300 विद्यार्थ्यांशी पालकांचा संपर्क झाला आहे. राज्य नियंत्रण कक्ष या विद्यार्थ्यांशी संपर्कात असून महाराष्ट्र शासनाकडून या विद्यार्थ्यांना तसेच अडकलेल्या नागरिकांना मायदेशात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. सिंहगड येथील निवासस्थानी युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थ्यी तसेच नागरिकांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार बोलत होते.

मंत्री वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्रातील युक्रेनमध्ये अंदाजे 1200 विद्यार्थ्यी अडकले असून 300 विद्यार्थ्यांनी पालकांशी सपंर्क साधला असल्याची माहिती नुकतीच प्राप्त झाली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती जिल्हास्तरावर देखील संकलित करण्याचे काम सुरू आहे. सर्व जिल्हाधिकारी यांनी देखील हेल्पलाईन नंबर जाहिर केलेले आहेत. राज्याचा नियंत्रण कक्ष 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर मोबाईल तसेच व्हॉटसअप क्रमांक 9321587143 आणि controlroom@maharashtra.gov.in या ईमेलवर संपर्क साधावा.

मंत्री वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्रातील किती लोक अडकले आहेत याची माहिती विभाग घेत आहे. तात्काळ संपर्क केंद्रही सुरू केले आहे. जी जी मदत हवी असेल त्या मदतीसाठी राज्य सरकार देण्यास तयार आहे. केंद्र सरकारने उपाययोजना केल्या आहेत. कदाचित युक्रेन मधून विमान उडू शकणार नाही. बाजूच्या देशातून विमान जर घेतले तर त्यासाठी तयारी दर्शवली आहे. या सगळ्या विद्यार्थ्यांची माहिती जिल्हा स्तरावर संकलित करण्याची तयारी आम्ही केली आहे. काही लोकांशी संपर्क होण्यात अडचणी येत आहेत. तसेच युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी केंद्रीय परराष्ट्र मंत्री कार्यालयाने नवी दिल्ली येथे हेल्पलाईन्स कार्यन्वित केल्या आहेत. केंद्रीय परराष्ट्र मंत्री कार्यालय, नवी दिल्ली येथील क्रमांक खालीलप्रमाणे आहेत. (हेही वाचा: रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष थांबण्याची शक्यता; वाटाघाटी करण्यासाठी मिन्स्कला शिष्टमंडळ पाठवण्यास Vladimir Putin तयार)

टोल फ्री – 1800118797
फोन 011-23012113 / 23014104 / 23017905
फॅक्स 011-23088124
ईमेल situationroom@mea.gov.in या हेल्पलाईनवर संपर्क
साधावा असे आवाहन करण्यात आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!