सामाजिकसोलापूर

आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट .

रेल्वे हद्दीतील झोपडपट्टीवासियांचे पुर्नवसन करा

24 मराठी न्यूज, सोलापूर जिल्हा प्रतिनिधी श्री प्रकाश इंगोले

बुधवारी आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहरामधील रेल्वे हद्दीतील झोपडपट्टी वासीय कुटुंबियांना मोबदला व त्यांचे पूनर्वसन करण्याकरीता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी केली.यामध्ये सोलापूर शहरामध्ये रेल्वेच्या जमिनीवरील गरीबी हटाव नं. 1 व 2 व इतर ठिकाणी मोठ्याप्रमाणात झोपडपट्टी निर्माण झालेली आहे. सदर झोपडपट्टीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून नागरीक राहत आहेत. सदर ठिकाणी गोर-गरीब, बांधकाम कामगार, विडी कामगार व इतर कामगार राहत असून त्यांचा उदरनिर्वाह दैनंदिन रोजंदारीवर अवलंबून आहे. सदर भागामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने रस्ते, ड्रेनेज, पिण्याच्या पाईप लाईन, लाईट इ. सोयी-सुविधा पुरविण्यात आलेले आहेत

तसेच तेथील रहिवाश्यांकडून महानगरपालिका टॅक्स घेत असून त्यांना लाईट बिल पण भरावे लागत आहे. या भागातील नागरीकांना रेल्वे प्रशासनाकडून अतिक्रमण काढण्याची नोटीस देण्यात आलेली आहे. यामुळे तेथील कुटुंबिय बेघर होणार असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सदर रहिवाश्यांचे पुर्नवसन करणे व त्यांना योग्य तो मोबदला देण्यात यावा याबाबतआमदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी केली.

सदर प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून सांगितले कि, रेल्वे हद्दीतील झोपडपट्टी वासीयांचा विषय गंभीर असून याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. याकरीता लवकरात लवकर संबंधितांची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले.

🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!