कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन.
24 मराठी न्यूज नेटवर्क
पंढरपूर : रयत शिक्षणसंस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील या स्वायत्त महाविद्यालयात वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागाच्या वतीने राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत दोन दिवसीय अंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन दि. २७ व २८ जानेवारी, २०२३ रोजी केले असुन “ India @ 75 : Sustainable Development through Commerce and Management ” या विषयावरती देशविदेशातून वेगवेगळे विचारवंत उपस्थित राहून विचारमंथन करणार आहेत. आज देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना शाश्वत व समतोल विकासाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी वाणिज्य विद्याशाखेद्वारा उद्योजकीय कौशल्ये, तंत्रे, स्वयंरोजगाराच्या संधी, कृषी प्रक्रिया उद्योग, शाश्वत शेती इत्यादी विषयावर मार्गदर्शन होणार असून विविध’ क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींना’ सामावून घेत ‘Panel Discussion’ या विशेष सत्राचेही आयोजन करण्यात आले आहे. परिषदेमध्ये जवळपास दोनशे विचारवंत व संशोधक सहभागी होत आहेत.
दोन दिवसीय परिषद शाश्वत विकासाच्या दृष्टीने दिशादर्शक ठरेल, असा विश्वास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांन सदर परिषदेमध्ये डॉ. लिटोन मोवाली बांगलादेश . डॉ. लेसन आझादी , प्रा. डॉ. निसार अहमद मुल्ला हैदराबाद , डॉ. जगदीश गौडा के.एम. कर्नाटक, डॉ. मल्लाप्पा खोदन्पूर कर्नाटक, उद्योगपती मा. अविनाश शिरगावकर, डॉ. सचिन लढ्ढा, प्रा. डॉ. ए. एम. गुरव, प्राचार्य डॉ. जी. वाय. शितोळे, प्राचार्य डॉ. आर.एस. साळुंखे, प्राचार्य डॉ. पी.जी. पवार, प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे, प्रा. डॉ. सारंग भोला, प्रा. डॉ. विजय कुंभार, प्रा. डॉ. प्रकाश व्हनकडे इत्यादी विचारवंत मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेमध्ये देशविदेशातून संशोधकांकडून शोध निबंध मागवण्यात आले असून सदर शोधनिबंध रीसर्च जर्नल मध्ये प्रकाशित केले जाणार आहेत, अशी माहिती वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे उपप्राचार्य व अधिष्ठाता प्रा. डॉ. बी. बी शितोळे यांनी दिली.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७