लोटस इंग्लिश स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित,
२४ मराठी न्यूज पंढरपूर संपत लवटे.
श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित, लोटस इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,आणि (आय.सी.एम.एस) कॉलेजमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिन संस्थेचे अध्यक्ष एच.एम.बागल उपाध्यक्ष बी.डी. रोंगे तसेच प्रमुख पाहुणे धनंजय सालविठ्ठल यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. स्वाईप अंतर्गत असणाऱ्या सर्व ज्युनिअर आणि सीनियर महाविद्यालयाचे अधिष्ठाता,विभाग प्रमुख, सर्व विद्यार्थी,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,यांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्कृष्ट असे भाषण सादर केले. तसेच इयत्ता १ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर पॅट्रिक डान्स,देशभक्तीपर सॉंग,सादर करून पाहुण्यांची व इतर मान्यवरांची मने जिंकली. प्रजासत्ताक दिनानिमित्त आपले मनोगत मांडताना स्कूलच्या प्राचार्या.डॉ.जयश्री भोसले म्हणाल्या की २६ जानेवारी १९५० रोजी भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीत एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती.आपल्या देशातील थोर देशभक्त व शहिदांच्या अपार त्रासातून मिळालेले हे स्वातंत्र्य टिकवून ठेवणे हे आपल्यापैकी प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे.त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकाने देशाच्या विकासात योगदान देणे आवश्यक आहे.असे सांगून भारतीय प्रजासत्ताक दिनावर विशेष प्रकाश टाकला.तसेच ज्या विद्यार्थ्यांनी ओलंमपियाड परीक्षा मध्ये यश संपादन केले.अशा विद्यार्थ्यांना पालक संभाजी पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र व मेडल देण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी. रोंगे,आणि खजिनदार दादासाहेब रोंगे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सविता झांबरे, ज्योती पिंगळे, अंजली मोरे,यांनी केले तर आभार प्रदर्शन अमृता बाबर यांनी केले. तर मिठाई वाटपाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित, लोटस इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७