पोलिस निरीक्षकांच्या दबंग एंट्रीने नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा , तोंड बघून कारवाई केल्याचा नागरीकांचा आरोप !!
24 मराठी न्यूज
मोहोळ तालुका प्रतिनिधी ( राजेश शिंदे )
सोलापूर शहरातील व्यवस्थेचे स्टिअरिंग वाहतूक व्यवस्थित हाताळलेले घुगे जिल्ह्यातील हेवी पोलिस स्टेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहोळ पोलिस स्टेशनचे स्टिअरिंग कशा पद्धतीने हाताळतात , यावरच शहर व तालुक्याची कायदा सुव्यवस्था अवलंबून आहे . एकंदरीत पोलिस निरीक्षकांच्या एंट्रीने नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा होत आहे .
मोहोळ नगरपरिषद व पोलीस प्रशासन या वाहतूक कोंडीवर कोणताही तोडगा काढण्यात अद्यापही अपयशी ठरल्याने शहरवासियांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ऐन वाहतूक कोंडीच्या वेळी वाहतूक पोलिसच गायब असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही
.शहरातून जाणाऱ्या मेन रोड वर ठिकठिकाणी अनधिकृतपणे वाहने पार्किंग केली जात आहेत. तर मराठी शाळेच्या समोरच भाजी मंडई भरते त्यावेळेला दुचाकी आणि चार चाकी रस्त्याच्या मध्येच लावून दोन्ही बाजूकडे असलेल्या फेरीवाल्यांच्या हातगाड्या हा रहदारी ठप्प होण्याचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होते.
विनोद घुगे यांची मोहोळ पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकपद पदभार घेतला असून त्यांच्या समोर अनेक आव्हाने आहेत . दरम्यान पाचव्या दिवशी ठाण्यातील पोलिस अधिकारी कर्मचारी यांना सोबत घेत शहरातील उड्डाण पूल , छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मुख्य रस्त्यावर पायी फिरत रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी , रस्त्याला अडथळा ठरणारे डिजिटल बॅनर व बोर्ड , साहित्य जप्त करीत संबंधितांना समज दिली आहे . पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी यापूर्वी नागरी हक्क संरक्षक विभाग ,अनेक आव्हाने स्टेशनच्या बाहेरच झालेली मिटवा मिटवी व त्यातूनच समाजद्रोही गुन्हेगारांचा होत असलेला उदय अशा प्रवृत्तींना थोपविण्याचे मोठे आव्हान पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्यापुढे असणार आहे .
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७