पौट साठवण तलाव, मंगळवेढा उपसा सिंचन, पंढरपूर एमआयडीसी यासारख्या विविध बाबींवर आमदार. समाधान आवताडे यांनी सभागृहात उठविला आवाज.
24 मराठी न्यूज जिल्हा प्रतिनिधी प्रकाश इंगोले,
पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा कार्यक्षेत्राच्या मतदारसंघातील साठवण तलाव,पौट हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित होता. सदर प्रकल्पामुळे आसबेवाडी, सलगर बुद्रुक, सलगर खुर्द, शिवणगी, सोड्डि, खवे, मल्लेवाडी, बावची, कागष्ट, कात्राळ कर्जाळ ग्रुप, येड्राव , हुलजंती, निंबोणी जंगलगी, जीत्ती इत्यादी महत्त्वाची गावे सिंचनाखाली येणार आहेत. या प्रकल्पाची सिंचन क्षमता सुमारे १५०९ हेक्टर इतकी आहे .सदर कामास सन २००० साली प्रशासकीय मान्यता मिळून तदनंतर वाढलेल्या किमतीमुळे सन २००९ मध्ये पुन्हा सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती .वेळेत प्रकल्प सुरु न होऊ शकल्यामुळे सदरच्या प्रकल्पाच्या रकमेत वाढ झाली आहे .तरी सदर चा महत्वकांक्षी प्रकल्प त्वरित पूर्ण होण्याकरिता नव्याने प्रशासकीय मान्यता देऊन आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांनी केली आहे .मतदार संघातील अनेक दिवसांपासून शिरसी, लेंडवेचिंचाळे, आंधळगाव, लक्ष्मी दहीवडी,पाटखळ, भाळवणी, हाजापुर, गणेशवाडी,शेलेवाडी, खुपसंगी, गोणेवाडी, खडकी,मेटकरवाडी, रड्डे,निंबोणी, खवे, जालीहाळ, हिवरगाव, नंदेश्वर, जुनोनी, भोसे, सिद्धनकेरी, जित्ती,येड्राव या २४दुष्काळी गावांचा प्रश्न प्रलंबित आहे. सदर दुष्काळी गावांना दुष्काळमुक्त करण्यासाठी मंगळवेढा उपसा सिंचन योजना राबविण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आलेला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून सदर योजना व्हावी याकरता सततचा वारंवार पाठपुरावा करून देखील प्रत्यक्षात हाती काहीच लागत नव्हते. माझ्यासहित माझ्या मतदारसंघातील नागरिकांना हे केवळ मृगजळच आहे असे त्यांचे मत झाले होते. परंतु मागच्या अधिवेशनामध्ये सदर प्रश्न संदर्भात आमदार समाधान आवताडे यांनी लक्षवेधीद्वारे यांच्याकडे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे त्यावर लक्ष वेधून सदर योजना त्वरित पूर्ण होण्याकरता विनंती केली होती. त्यांनी सदर योजना त्वरित पूर्ण करण्याचे आदेश दिले होते सदर आदेशानंतर त्यास गती मिळून त्याच्या मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. याकरिता आमदार आवताडे यांनी मंत्री महोदय यांचे अभिनंदन केले. आणि या चर्चेद्वारे अशी मागणी आहे की या मार्चअखेर सदर प्रस्ताव मंत्रिंडळासमोर ठेऊन मान्यता द्यावी असे आमदार आवताडे यांनी सांगितले आहे.शिरनांदगी, रेवेवाडी, बावची, पौट ,सोड्डी ,पडोळकरवाडी, लोणारहुन्नर,आसबेवाडी ,महमदाबाद(हु),शिवणगी,मारोळी,चिक्कलगी, जंगलगी ,लवंगी, येळगी,सलगर , सलगर(खु) सद्यस्थितीत सदरील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना व जनावरांना पिण्याचे पाणी देखील मिळत नाही आहे. पाण्याअभावी नागरिकांचे व त्यांच्या जनावरांची हेळसांड होत आहे. तसेच सध्या कोणत्याही प्रकारची पाणी पुरवठ्याची शासकीय योजना कार्यान्वित नसल्याने या गावांत सततचा दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. यावर उपाय म्हणून सदर तलाव म्हैसाळ प्रकल्पाच्या पाण्यामधून भरून दिल्यास गावातील शेतीला, येथील नागरिकांना तसेच जनावरांना चांगला फायदा होऊ शकतो. शिरनांदगी व मारोळी तलाव मंगळवेढा वितरीका क्र. २ जवळ असल्याने कालव्यातून वेगळी पाईप लाईन काढल्यास सदरचा तलाव भरणे सोपे होऊ शकते. तसेच पडोळकरवाडी तलाव जत शाखा कालव्याजवळ व लवंगी तलाव उमदी वितरीकेपासून जवळ आहे. सदर कालव्यापासून वेगळी पाईप लाईन केल्यास सदरचे तलाव भरू शकतात. वरील उल्लेखित तलाव म्हैसाळ योजना प्रकल्पामधून भरणेकामी अतिरिक्त पाण्याची व निधीची तरतूद करावी अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांनी सभागृहामध्ये बोलताना केली आहे.पंढरपूर – मंगळवेढा मतदार संघातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरच्या आस्थापनेवरील कर्मचा-यांच्या सेवा ७ ते ३० वर्षे झालेल्या आहेत. तथापि,सदर कर्मचा-यांना शासन निर्णयाप्रमाणेपूर्ण महागाई भत्ता व घरभाडे भत्ता देण्यात न आल्याने त्यांना तुटपुंज्या पगारात काम करावे लागत आहे. वाढती महागाई व तुटपुंज्या वेतनामुळे कर्मचा-यांना घरखर्च भागविणे अतिशय जिकीरीचे होत आहे व दैनंदिन आर्थिक विवंचनेला देखील सामोरे जावे लागत आहे. यामुळे वेळोवेळी निर्गमित होणा-या शासन निर्णयाप्रमाणे मंदिर समिती कर्मचा- यांना संपूर्ण महागाई भत्ता व घरभाडे भत्ता अनुज्ञेय करणेबाबतचा प्रस्ताव तयार करून धर्मादाय आयुक्त, मुंबई यांचेमार्फत दि.२०/९/२०२२ रोजीच्या पत्रान्वये शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला आहे.तरी, सदर प्रस्तावानुसार त्यांच्या मागणीचा सहानुभुतीपूर्वक विचार करून शासन निर्णयाप्रमाणे मंदिर समिती कर्मचा-यांना संपूर्ण महागाई भत्ता व घरभाडे भत्ता देण्याची मागणी आमदार आवताडे सदर चर्चेद्वारे केली आहे.चौकट – एमआयडीसी स्थापनेसाठी समिती नेमा सदर एमआयडीसी स्थापनेच्या दृष्टीकोनातून उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी या मागणीची त्वरित दखल घेऊन प्रत्यक्षात दालनात बैठक घेऊन स्थळपाहणी व निश्चिती करण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या या कार्य तत्परतेबद्दल आमदार आवताडे यांनी मंत्री महोदय यांचे विशेष धन्यवाद व्यक्त केले. तसेच त्यांनी याबाबत उच्चाधिकार समिती ची स्थापना करण्याचे आदेशही केले आहे. सदर चर्चेद्वारे आमदार आवताडे यांनी एमआयडीसी अनुषंगाने उच्चाधिकार समितीची त्वरित स्थापना करून पंढरपूर एमआयडीसी उभारणी करण्याची कार्यवाही त्वरित करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७