जलशक्ती मंत्रालय कमिटीवर खासदार. रणजितसिंह नाईक-निंबाळकर
24 मराठी न्यूज पंढरपूर/ प्रतिनिधी
माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत पाणी वाटप पॉलिसी ठरवणाऱ्या कमिटी वर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाली आहे.देशाच्या शेती पाण्याच्या प्रश्नावर विविध धोरणे ठरवणे, यामध्ये नदीजोड प्रकल्प, धरणे, पाण्याचे स्त्रोत्र ठरवणे, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना तसेच पिण्याच्या पाण्याच्या योजना ठरवणे, जल जीवन मिशन अंतर्गत देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये हर घर जल ही योजना राबवणे, दुष्काळी पट्ट्यातील जनतेला शेती पाण्यासाठी नदीजोड प्रकल्पाचा अभ्यास करणे, ज्यादा पाऊस झाल्यानंतर वाहून जाणाऱ्या पाण्यावर अभ्यास करून ते कशा पद्धतीने ते वाहून जाणारे पाणी वापरता येईल यावर अभ्यास करणे, केंद्र व राज्य यांच्यामध्ये समन्वय ठेवून पाण्याची धोरणे ठरवणे अशा अनेक महत्त्वाचे निर्णय घेणे अशा कमिटीवर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची निवड केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी केली आहे. याबाबतचे शासन स्तरावरचे सर्व आदेश निघाले आहेत. या निवडीमुळे महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्याला नक्कीच याचा फायदा होणार असल्याचे सातारा जिल्हा भाजपा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी सांगितले.
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७*