बेंगलोर येथील भाविकांकडून 10 लाख रूपयांची देणगी. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराच्या अन्नछत्रासाठी.
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने बेंगलोर येथील रोहिणी निलेकणी यांचा सत्कार करताना अनिल पाटील, किरण घाडगे, विनोद पाटील व इतर.
24 मराठी न्यूज पंढरपूर /प्रतिनिधी
पंढरपूर- दिनांक 17- 3- 23श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरला बेंगलोर येथील भाविक श्रीमती रोहिणी नंदन निलेकणी यांनी अन्नदानासाठी रक्कम रू.10.00/- लक्ष रूपयांची देणगी धनादेश स्वरूपात दिली आहे. त्याबद्दल त्यांचा मंदिर समितीच्या वतीने लेखा अधिकारी श्री.अनिल पाटील यांच्या हस्ते येथोचित मानसन्मान करण्यात आला. त्यावेळी मंदिर समितीचे विभाग प्रमुख श्री.विनोद पाटील व मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते. मंदिरे समितीच्या वतीने श्री.संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रामध्ये दैनंदिन दुपारी 12.00 ते 2.00 व सायंकाळी 7.30 ते 9.30 या वेळेत मोफत अन्नदान करण्यात येते. त्याचा दैंनंदिन 1200 ते 1500 भाविक लाभ घेतात. सदर अन्नछत्रात अन्नदान करण्यासाठी श्रीमती रोहिणी निलेकणी, बेंगलोर यांनी देणगी दिली आहे.
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७*