24 मराठी न्यूज पंढरपूर प्रतिनिधी
येथील इंदिरा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कर्मवीर औदुंबररावजी पाटील विद्यालयामध्ये पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार समाधान आवताडे यांच्या आमदार निधीतून मंजूर झालेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संगणक कक्षाचे उदघाटन नामवंत उद्योगपती संजयमालक आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष वैभव साळुंखे होते.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संजय आवताडे म्हणाले की, आधुनिकतेची कास धरलेल्या, तांत्रिकदृष्ट्या पुढारलेल्या या विश्वामध्ये नाविन्यपुर्ण गोष्टी आत्मसात करण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे संगणक होय. शालेय जीवनातील विद्यार्थ्यांना संगणक या तांत्रिक प्रणालीचा जास्तीत जास्त सहवास लाभावा. व त्यांच्या चौकस नैतिक विचारक्षमतेला वाव मिळावा, यासाठी आ. आवताडे यांच्या माध्मातून साकारझालेले हे संगणक दालन निश्चितपणे विद्यार्त्यांना उपयोगी पडेल, या दालनाला ज्ञानाचा महासागर असलेले भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिल्याबद्दल त्यांनी विद्यालयांचे कौतूक केले. यावेळी यशोदा पतसंस्था मंगळवेढा च्या चेअरमन सौ. निलाताई आटकळे यांनीही शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणात वैभव साळुंखे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व ज्ञान अदभूत आहे. विद्यार्थ्यांनी प्रज्ञाशिल करुणेचा अंगीकार करुन सर्वच विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या सारखे ज्ञानवंत व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक सिकंदर ढवळे यांना ग्लोबल हयमुन पीस विद्यापीठाने पी.एचडी(डॉक्टरेट) पदवी देवून सन्मानित केल्याबद्दल संजय आवताडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर नगरसेवक सुजितकुमार सर्वगोड, इब्राहीम बोहरी, म्हाडा चे अभियंता मिलींद आटकळे, संस्थेच्या सचिवा स्मिता आटकळे, संस्थेचे संचालक दिनेश शिनगारे, सरस्वती विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका भाग्यश्री आचलारे बालसुधारग्रहाचे राहुल आर्वे, रुखी समाज अध्यक्ष गुरु दोडिया, सयाजी बागडे महाराज विद्यार्थी वसतीग्रहाचे अधिक्षक गणपत बनसोडे, संताबाई विद्यार्थी वसतीग्रहाचे अधिक्षक डांगे, सामाजिक कार्यकर्ते अजित खिलारे, शेखर भोसले, विनोद लटके, भैय्या कळसे, अतुल मुरडे, नवनाथ शिंदे, अक्षय कांबळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक उदय खटावकर, प्रविण कटकधोंड, तुकाराम खंदाडे, विवेक जगताप, सचिन कलूबर्मे, सतीश चंद्राराव, शिवाजी फटे, कुबेर जाधव आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सिकंदर ढवळे यांनी केले. सुत्रसंचालन संगिता मासाळ-टकले यांनी केले. तर आभार भारत इंगळे यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार आवताडे यांचे स्विय सहाय्यक नवनाथा शिंदे याचां वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७*