"This news portal adheres to the Digital Media Ethics Code, 2021, established under the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, notified by the Ministry of Information and Broadcasting (MIB). Furthermore, it ensures compliance by submitting mandatory monthly reports to the government as stipulated.

शैक्षणिक

वेळेवर प्रश्नपत्रिका न देणाऱ्या महाविद्यालयांवर होणार कारवाई.

सोलापूर विद्यापीठाची माहिती : ९० टक्के प्रश्नसंच तयार

24 मराठी न्यूज सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा १२ जूनपासून नियोजित असून, सोमवारी, २२ मेअखेर पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ९० टक्के प्रश्नसंच तयार झाल्या आहेत. यंदा नियोजित वेळेनुसार परीक्षा होणार आहेत. परीक्षेचा वेळापत्रक लवकरच जाहीर होईल. परीक्षा केंद्रात प्रश्नपत्रिका द्यायला पाच मिनिटांचाही उशीर झाल्यास संबंधित महाविद्यालयांवर कारवाई करू, अशी माहिती विद्यापीठाने दिली.परीक्षा नियोजनासाठी प्रभारी कुलगुरु डॉ. रजनिश कामत यांच्या अध्यक्षतेखाली वारंवार बैठका सुरू आहेत. परीक्षा नियोजित वेळेनुसार – होण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर तयारी करीत आहे. मागच्या परीक्षांमध्ये गोंधळ झाला. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका एक ते दोन तास उशिरा मिळाल्या. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. ढिसाळ नियोजन विरोधात अनेक विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठ विरोधात आंदोलन करून लक्ष वेधले. यंदा अशा चुका पुन्हा होऊ नयेत, याकरता विद्यापीठाने डी.ए.व्ही. वेलणकर कॉलेज ऑफ कॉमर्समधील तज्ज्ञ प्राध्यापक डॉ. दीपक ननवरे यांची विशेष कार्यासन अधिकारी (ओएसडी) म्हणून नियुक्ती केली आहे. डॉ. ननवरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क कमिटी नेमले आहे परीक्षेपासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात येईल. त्यासंदर्भात उपाययोजना करण्यात येईल, अशी ग्वाही प्रभारी कुलगुरु डॉ. कामत यांनी दिली. तसेच यंदाच्या वर्षी या सत्रासाठी विद्यार्थ्यांकडून विलंब शुल्क माफ करण्याच्या प्रभारी कुलगुरु डॉ. कामत यांच्या सूचनेचे सर्वांनी स्वागत केले.

विद्यापीठ सतर्क-दरम्यान, मागच्या वेळी काही महाविद्यालयांकडून चुका झाल्या. त्याबद्दल चौकशी कमिटीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली आहे. यंदा चुका होऊ नयेत, याकरता विद्यापीठाकडून काळजी घेतली जात आहे. ज्या महाविद्यालयांकडून प्रश्नपत्रिका द्यायला उशीर होईल, त्यांच्यावर निश्चित कारवाई करू. तशी सूचना महाविद्यालयांना दिली आहे. यंदा विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, अशी माहिती विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिली.

🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!