सहकार शिरोमणी निवडणूकी साठी ठाकरे गटाची शिवसेना काळे यांच्या पॅनेलला पाठींबा
सहकार शिरोमणी निवडणूकीसाठी ठाकरे गटाची शिवसेना काळे यांच्या पाठीशी
24 मराठी न्यूज पंढरपूर/प्रतिनीधी –
पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊसाचा प्रचंड प्रश्न भेडसावत होता. त्यामुळे स्व.वसंतराव काळे यांनी चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याच्या निर्मितीचे स्व्प्न पाहिले होते. विठठल परिवारामध्ये त्यावेळी केवळ विठठल कारखाना आणी पांडूरंग परिवाराकडे पांडूरंग कारखाना असे दोनच साखर कारखाने आपल्या तालुक्यात होते. त्यामुळे कारखाना उभारणीसाठी स्व.वसंतदादा यांनी तब्ब्ल 14 वर्षे यासाठी मोठा पाठपुरावा केला होता. त्यावेळी असणाऱ्या शासनाच्या नियमामुळे वरचेवर अडचणी निर्माण होत होत्या. दरम्यानच्या काळात शिवसेना भाजप युतीचे सरकार या राज्यामध्ये आले. त्यावेळी केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी काँग्रेस विचारसरणीचे स्व.वसंतदादा यांनी शिवसेनेत प्रवेश करुन या कारखान्याला परवानगी मिळविली. त्यामुळे त्यावेळी राज्यातील शिवसेनेचा कारखाना म्हणून या कडे आज मितीलाही पाहिले जात आहे. त्यामध्ये आम्ही शिवसैनिक आमची त्या कारखान्यावर आत्मियता आहे. म्हणूनच आम्ही या निवडणुकीत विद्यमान चेअरमन कल्याणराव काळे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पॅनेलला पाठींबा व्यक्त करीत आहोत. अशी माहिती शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते साईनाथ भाऊ अभंगराव यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले. पंढरपूर तालुक्यातील ओलिताखाली आलेल्या जमीनीमुळे ऊसाचे बेसुमार उत्पादन वाढले होते. यासाठी विठठल कारखान्यावर सर्व ऊस गाळप करण्याची अडचण निर्माण होत होती. कर्मवीर औदुंबर आण्णा पाटील यांच्या विचारातून नवीन साखर कारखान्याची गरज असल्याचे लक्षात आले. त्यावेळी त्यासाठी विठठल परिवारातून प्रयत्न केले गेले. त्यामध्ये कर्मवीर औदुंबर आण्णा पाटील या कारखान्याची सर्वस्वी जबाबदारी सव.वंसतदादा काळे यांच्यावर सोपविण्यता आली होती. यामुळे या साखर कारखान्याची निर्मिती होण्यासाठी जीवाचे रान केले होते ते आम्ही उघडया डोळयाने पाहिले होते. त्यामुळे शिवसेनेच्या सत्तेचा उपयोग आम्ही सर्वांनी मिळून चंद्रभागा साखर कारखान्याची निर्मिती करण्यासाठी करुन घेतला होता. त्यावेळी अनेक शिवसैनिकांना रोजगारही उपलब्ध झाला होता.काही शिवैसैनिकांना या कारखान्याच्या संचालक पदावर जाण्याचा मानही मिळालाहोता. त्यामुळे या कारखान्यावर आजही शिवसैनिक मोठया आत्मियतेने पाहत आहेत. याचा कारखान्याचा कारभार मागील अनेक वर्षे चांगल्या पध्दतीने झाला होता. काही अडचणीमुळे सध्या बीले देण्यास उशीर होत आहे. त्यासाठी विद्यमान चेअरमन कल्याणराव काळे हे प्रयत्नशिल असल्याचे साईनाथ अभंगराव यांनी सांगीतले. यावेळी या निवडणुकीसाठी उध्दव ठाकरे गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पाठींबा व्यक्त केला यामध्ये जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे, जिल्हा उपप्रमुख सुधीर अभंगराव, शहर प्रमुख रविंद्र मुळे, तालुका उपप्रमुख कल्याण कवडे, शहर उपप्रमुख तानाजी मोरे, लंकेश बुराडे, युवा सेना तालुका प्रमुख योगेश चव्हाण, युवा सेना संघटक फिरोज तांबोळी, ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हा प्रमुख जयवंतराव माने, तालुका समन्वयक बंडू घोडगे, शहर संघटक सचिन बंदपटटे, युवा सेना तालुका समन्यवयक रणजीत कदम, युवा सेना तालुका उपप्रमुख प्रविण पवार, करकंब युवा सेना प्रमुख सचिन मोरे, शाखा प्रमुख प्रदीप खिलारे, जेष्ठ शिवसैनिक काकासो बुराडे यांचेसह शहर व तालुक्यातील आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी चेअरमन कल्याणराव काळे, भगिरथ दादा भालके, उपस्थित होते. चौकट :गठुडया शिवाय बोलतच नाही : भगिरथ भालकेसहकार शिरोमणी साखर कारखाना हा सांगोला मतदार संघा कार्यक्षेत्रामध्ये आहे. या कारखान्याच्या निवडणुकीत बाहेरच्यांनी लुडबुड करुन नये असे सतत सांगीतले जात आहे. यामध्ये बाहेरचे म्हणजे कोण ? तर बहुतेक आमदार शहाजीबापू पाटील यांनाच म्हणत असावेत. परंतू त्यांचा वसूलदार भाचा त्यांच्याच मांडीवर बसून असतो. यामुळे ते नेमके कोणाबाबत बोलत आहेत. हे समजेनासे झाले आहे. असा टोला भगिरथ दादा भालके यांनी अभिजीत पाटील यांना लगाविला आहे. आम्हाला परिचारकांकडून फोन आलेत असेही म्हणले जात आहे त्यामुळे ते कार्य त्यांच्या फोनचे ऑपरेटर आहेत काय ? असा सवालही भालके यांनी केला आहे. मी हैद्राबादला जावून गाठोडे आणले असून ते कल्याणरावसाठी उपयोग पडेल असे सांगत आहेत. यामुळे या गडयाला गठुडे उचलायची सवय लागली आहे. त्यामुळे सतत गठुडया शिवाय बोलतच नाही अशी टिकाही केली.चौकट :माझ्या मुलीला सत्काराला बोलवून माझा प्रवेश केला जाहीर.या सहकार शिरोमणीच्या निवडणुकीमध्ये सध्या विरोधकांनी प्रवेश घेण्यावर भर दिला आहे. परंतू कोणत्या तरी वेगळया कारणाने फोन करुन बोलविले जाते. आणी प्रवेश केल्याचे जाहीर केले जाते. याचा अनुभव मला स्वत:ला आला आहे. माझी मुलगी पेालिस झाली आहे. यामुळे तिचा सत्कार करण्यासाठी घेवून या असा निरोप आल्यानंतर मी केवळ सत्कारासाठी गेलो होतो. त्यावेळी माझाही सत्कार करण्यात आला होता. परंतू तो त्यांच्या गटात प्रवेश नव्हता मी काळे यांच्याच पाठीशी आहे. असा खुलासा गार्डी येथील शिवसेनेचे शिवाजी जाधव यांनी भर पत्रकार परिषदेमध्ये सांगीतले. यावर कल्याणराव काळे यांनीही अभिजीत पाटील यांना प्रवेश प्रवेश ही सवय लागली असून डॉ.रोंगेसर व अभिजीत पाटील हे झोपतेच प्रवेश झाल्याचे बडबडतील असा मिश्किल टोलाही काळे यांना लगाविला आहे.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com