24 मराठी न्यूज पंढरपूर प्रतिनिधी प्रकाश इंगोले,
पंढरपूर च्या वारीला येणार्या वारकरी व विठ्ठल भक्त पायी चालत येत असतात.चालुन पाय दुखत असेल त्यांच्या पायाची तेल ने मसाज रात्री 1 वाजता पालखी वाखरी जवळ येथे करण्यात आली.याचा लाभ खुप जणांनी घेतला आणी भरपुर आशीर्वाद वारकरी भक्तांना दिला.आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचे ऋण फेडण्यासाठी आपण सत्कर्म करायला पाहिजे गोरगरिबांना मदत तसेच दानधर्म करायला पाहिजे ही भावना प्रत्येक माणसाने आपल्या मनामध्ये जागृत ठेवली पाहिजे.अशाप्रकारे समाजकार्य पंढरपूर शहरातील मुस्लिम युवक मुजम्मील कमलीवाले यांनी सुरू ठेवलेले आहे
कोरोना सारख्या महामारी मध्ये पंढरपूर शहरात त्यांनी स्वच्छता व वैद्यकीय सेवा पुरवून तसेच गोरगरीब यांना अन्नदान करून आपली समाजसेवा जनतेच्या हितासाठी व त्यांच्या रक्षणासाठी केलेली आहे.”अनाथांचा नाथ म्हणून ओळखले जाणारे समाजसेवक मुजमील कमलीवाले यांना नुकताच शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार सन्मानीत करण्यात आले.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com