मंगळवेढा उपसा सिंचन योजना.
24 मराठी न्यूज मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील ११ गावांचा दौरा आमदार आवताडे यांनी अधिकाऱ्यांचा ताफा सोबत घेऊन पूर्ण केला. यामध्ये गावातील नागरिकांकडून लेखी तक्रारी घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना समोरासमोर विचारत अनेक तक्रारींचे निरसन केले त्याचबरोबर २४ गावचा मंगळवेढा उपसा सिंचन योजना या अधिवेशनापर्यंत मार्गी लागणार असल्याची माहिती ही आमदार आवताडे यांनी गाव भेट दौऱ्यामध्ये दिली.
या गाव भेट दौऱ्यामध्ये अनेक पशुपालकांनी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उपस्थित करत चारा डेपो सुरू करण्याची मागणी केली असता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना बोलून चारा डेपो सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी या दौऱ्यामध्ये उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब समिंदर तहसीलदार मदन जाधव गटविकास अधिकारी शिवाजीराव पाटील वन विभागाच्या अधिकारी चैत्राली वाघ जिल्हा परिषद बांधकाम चे नंदकुमार कोष्टी तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे यांचे सह सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी गाव भेट दौऱ्याच्या ताब्यात उपस्थित होते. त्यातील पाठखळ गावापासून या दौऱ्याची सुरुवात करण्यात आली.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com—————————————————, LIKE, SHARE, SUBSCRIBETHIS YOUTUBE CHANNEL—————————————————