I.C.M.S महाविद्यालय मध्ये स्वच्छ भारत श्रेष्ठ भारत एक दिवशीय कार्यशाळा संपन्न.
24 मराठी न्यूज पंढरपूर प्रतिनिधी श्री संपत लवटे
श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट स्टडीज कासेगाव पंढरपूर महाविद्यालयांमध्ये भारत सरकारच्या केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अभियान अंतर्गत आयसीएमएस महाविद्यालय कासेगाव या ठिकाणी स्वच्छ भारत श्रेष्ठ भारत ही कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेसाठी संतोष ऐतवाडकर घनकचरा व्यवस्थापन अधिकारी,पंढरपूर नगरपालिका पंढरपूर, आणि अभिजीत घाडगे शहर व्यवस्थापन पंढरपूर नगरपालिका पंढरपूर यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कार्यशाळा घेऊन महाविद्यालयाच्या आणि शाळेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये स्वच्छता राखण्याबाबत काही नियम सांगण्यात आले तसेच स्वच्छतेची सुरुवात नेहमी आपल्या घरातून करावी हे त्यांनी आवर्जून सांगितले तर या कचऱ्याचे व्यवस्थापनाची माहिती देखील दिली स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ भारत श्रेष्ठ भारत ही एक स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये पंढरपूर नगरपालिका सहभागी झाली आहे.तरी आपल्या परिसरात संदर्भातील स्वच्छतेबाबत त्यांनी माहिती सांगितली व उपायोजना करण्यासाठी मार्गदर्शन केले
या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा सत्कार महाविद्यालयाच्या कॅम्पस प्रमुख डॉ.जयश्री भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यशाळेसाठी विभाग प्रमुख मुकुंद चौगुले शिक्षिका कांचन नागणे,शामल निकम,अमृता चव्हाण,राजश्री भंडारी, सुप्रिया पाटील, यांनी परिश्रम घेतले. स्वच्छ भारत श्रेष्ठ भारत कार्यशाळा घेतल्याबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे,अध्यक्ष एच. एम.बागल,उपाध्यक्ष बी.डी.रोंगे खजिनदार दादासाहेब रोंगे यांनी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*