शैक्षणिक
लोटस इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व आय.सी.एम.एस महाविद्यालयाची नवरंगे बालकाश्रमास भेट.
24 मराठी न्यूज, पंढरपूर प्रतिनिधी श्री संपत लवटे
श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आणि आयसीएमएस महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पंढरपूर येथील नवरंगे बालकाश्रमास एक मुठ्ठी अनाज ही संकल्पना राबवून भेट दिली यामध्ये विद्यार्थ्यांनी गहू,तांदूळ,ज्वारी यासारखे अन्नधान्य भेट स्वरूपात दिले. ज्युनिअर कॉलेज आणि महाविद्यालय विविध प्रकारचे अनेक उपक्रम राबवतात अशी माहिती कॅम्पस प्रमुख प्राचार्या डॉ.जयश्री भोसले यांनी दिली. बालकाश्रमाच्या अधीक्षक राजश्री गाडे यांनी विद्यार्थ्यांनी भेट दिल्याबद्दल आभार व्यक्त केले तसेच बालकाश्रमाची सर्व माहिती कॉलेजच्या विद्यार्थ्यांना दिली यावेळी सुपरवायझर सुचित्रा पवार, केयर टेकर उषा माने,कुक अनुजा यादव,उपस्थित होते. या बालकाश्रमास भेट दिल्याबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी. रोंगे,अध्यक्ष एच.एम.बागल उपाध्यक्ष बी.डी.रोंगे खजिनदार दादासाहेब रोंगे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com