राजनंदिनी माध्यमिक विद्यालय चे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात घवघवीत यश
पंढरपूर तालुका प्रतिनिधी
दिनांक 18 डिसेंबर ते 19 डिसेंबर रोजी सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे घेण्यात आलेल्या 51 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये तालुक्यातील प्राथमिक विभागातील एकूण 112 शाळा व माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील एकूण 95 शाळा सहभागी झाल्या होत्या या सर्व शाळांमधून विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांवर आधारित विज्ञानाचे प्रयोग सादर केले होते. यामधून राजनंदनी माध्यमिक विद्यालयाच्या प्राथमिक विभागातून BMI ( Body Mass Index) या आरोग्य विषयी संबंधित असलेल्या प्रयोगाचे सादरीकरण केले. तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातून बायोगॅस या प्रकल्पावर आधारित प्रयोग घेतला होता. इयत्ता 9वी च्या विद्यार्थिनी आस्मा शेख व श्रद्धा कांबळे यांनी बायोगॅस या प्रयोगाचे सादरीकरण केले. उच्च माध्यमिक विभागातून बायोगॅस या प्रकल्पाची सोलापूर जिल्हा विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली. या प्रयोगासाठी विज्ञान शिक्षक श्री सागर शिंदे सर, श्री ऋतुराज नागटिळक सर तसेच सहाय्यक श्री भास्कर गावडे यांचे मार्गदर्शन मिळाले. मिळालेल्या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष, सचिव व मुख्याध्यापक श्री विठ्ठल होळकर सर व शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com