क्रीडा

कु.श्रावणी भोसलेचे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश

पंढरपूर तालुका प्रतिनिधी

कु.श्रावणी भोसले हिचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करताना विस्तार अधिकारी बंडू शिंदे, केंद्रप्रमुख श्रीकांत खताळ, शिक्षिका अश्विनी उबाळे, पालक दत्तात्रय भोसले, पोपट भोसले आदी. प्रतिनिधी पंढरपूर पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी श्रावणी दत्तात्रय भोसले हिने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक संपादन करून घवघवीत यश मिळविले आहे. जिल्हास्तरीय टॅलेंट हंट स्पर्धा पापरी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये पार पडल्या. यामध्ये जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी जिल्ह्यातील 22 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामधून विशेष वक्तृत्व सादर करीत श्रावणी भोसले हिने द्वितीय क्रमांक पटकावला. यावेळी विस्तार अधिकारी बंडू शिंदे, केंद्रप्रमुख श्रीकांत खताळ यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन श्रावणीचा सत्कार करण्यात आला

या यशासाठी श्रावणीला शिक्षिका अश्विनी उबाळे, वर्गशिक्षक शशिकांत कांबळे व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. तर श्रावणीच्या या यशाबद्दल तिचे गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे, केंद्रप्रमुख स्वाती डोंगरे, मुख्याध्यापक परमेश्वर गायकवाड, शिक्षक अरुण माळी, तानाजी ढेकळे, प्रमोद लोणारकर, समाधान आयरे, शिक्षिका पद्मिनी व्यवहारे, छाया कांबळे, वैशाली जगताप , वर्षा गोडसे, कल्पना माने, पालक दत्तात्रय भोसले, यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!