फसवणुक केलेल्या ऊस टोळी मुकादमावर गुन्हा नोंद होनेसाठी पाठपुरावा करावा :-चेअरमन,कल्याणराव काळे
यांचे कडे स्वाभिमानी शेतकरी ट्रॅक्टर मालक संघटनेने केली मागणी.
पंढरपूर तालुका प्रतिनिधी
वाहन मालकास ऊस तोडणी कामगार देतो असे सांगून टोळी न देता त्यांची फसवणुक करणारे मुकादम विरुध्द फसवणुकीचा गुन्हा नोंद होणेसाठी आपण पाठपुरावा करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी ट्रॅक्टर मालक संघटनेने सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांचेकडे केली…. .* *राज्यातील साखर कारखान्याचा गळीत हंगाम 2023-2024 मध्ये मोठ्या प्रमाणावर ऊसाचे गाळप होत आहे.. मात्र गाळप हंगामात बऱ्याच वाहतुकदारांच्या टोळ्या हजर झालेल्या नाहीत. ऊस वाहतुकदारांकडून लाखों रुपयांचे उचल ऊस टोळी मुकादमांनी घेतलेली आहे. मात्र ॲडव्हान्स घेवुनही टोळी कामावर हजर न केल्यामुळे अनेक वाहनमालकांची फसवणुक झालेली आहे.. अशा टोळी मुकादम यांचेवर फसवणुकीचा गुन्हा नोंद करुन शेतकऱ्यांना न्याय मिळणेबाबत आपण पाठपुरावा करावा अशी मागणी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांचेकडे तालुक्यातील वाहन मालकांनी केली.*यावेळी चेअरमन कल्याणराव काळे म्हणाले की, वाहन मालकांची फसवणूक करण्याचे प्रकार वरचेवर वाढत असून पंढरपूर तालुक्यात अनेक वाहन मालक यांची फसवणूक झालेली आहे. आशा टोळी मुकादम यांना आळा घालने गरजेचे आहे…फसवणूक करणारे टोळी मुकादम यांचेवर गुन्हा नोंद होणेसाठी वरिष्ठ पातळीवरून पाठपुरावा करून वाहन मालक यांना न्याय मिळवून देऊ असे या वेळी सांगितले.* यावेळी सहकार शिरोमणी चे संचालक गोरख जाधव, मोहन नागटिळक,सुरेश देठे,राजाराम पाटील, सुनिल पाटील,संतोष भोसले,जयनाना देशमुख,अमोल माने,योगेश ताड,कारखान्याचे माजी संचालक, विविध पदाधिकारी,कार्यकारी संचालक झुंझार आसबे,कैलास कदम, सेक्रेटरी मदारखान, उपस्थित होते.यावेळी सुधीर शिंदे,अण्णासाहेब कळकुंबे, कुबेर श्रीरसागर, संजय मोरे, विठ्ठल काळे,प्रभाकर नागणे, संजय गाढवे, भीमराव मेटकरी, अरुण कदम,ज्ञानेश्वर नागणे, वसंत रितुंड, अशोक रितुंड, आजिनाथ काळे, नवनाथ काळे,सतीश काळे, राजेंद्र काळे, कांतीलाल काळे, विठ्ठल सुरवसे, विष्णू सुरवसे, अजित कवडे, दिनेश कवडे, विश्वास कोडग , सिद्धेश्वर साळुंखे, विश्वास सुरवसे, वैभव यलमार, अमोल कवडे, साहेबराव जगदाळे, अमोल नागणे, कृष्णा नागणे, रोहित नागणे, नामदेव गाजरे, विष्णू गायकवाड, शिवाजी केदार, गणेश नागणे, भीमराव नागणे, अभिमान काळे, अमोल काळे, राजाराम काळे,गणेश साळुंखे आदी वाहन मालक उपस्थित होते
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com