राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या मोहोळ तालुका अध्यक्षपदी राहुल कसबे तर शहराध्यक्षपदी गौतम क्षीरसागर यांची निवड
मोहोळ ( प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या मोहोळ शहराध्यक्ष पदी गौतम क्षीरसागर तर तालुका अध्यक्ष पदी राहुल महादेव कसबे यांची निवड करण्यात आली. माजी आ. राजन पाटील, आ. यशवंत माने, लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा. सुनील मगरे, जिल्हाध्यक्ष भालशंकर यांच्या स्वाक्षरीचे अधिकृत पत्र देऊन निवड करण्यात आली
या निवडीबद्दल तालुकाध्यक्ष प्रकाश भाऊ चवरे, हेमंत गरड, बापू डोके, कुंदन धोत्रे, नागेश बिराजदार, राजू सुतार, जावीद बागवान, अतुल गावडे, शकील शेख आदि. नी निवडीबद्दल अभिनंदन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून पक्षीय संघटन वाढीसाठी प्रयत्नशील राहुन काम करणार असल्याचे नुतन तालुकाध्यक्ष राहुल कसबे यांनी यावेळी सांगितले.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com