आय.सी.एम.एस महाविद्यालयामध्ये रक्तदान शिबिर संपन्न
पंढरपूर तालुका प्रतिनिधी संपत लवटे
श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित,इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर अँड मॅनेजमेंट स्टडीज, कासेगाव या ठिकाणी डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर संपन्न झाले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ.ए.एस माने आणि कॅम्पस प्रमुख डॉ.जयश्री भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. या रक्तदानाचा मुख्य उद्देश म्हणजे शहरातील विविध रुग्णालयांमध्ये आजही काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे.याच अनुषंगाने तरुणाई मध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजवणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने रक्तदान हे आजच्या काळाची गरज आहे अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने व्यक्तीचा मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. त्यामुळे तरुणांनी अधिक अधिक रक्तदान करावे म्हणून इंडियन रेड क्रॉस सोसायटी सौ.सरजूबाई बजाज रक्तपेढी पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने हे रक्तदान शिबिर आयसीएमएस महाविद्यालयामध्ये संपन्न झाले. या शिबिरामध्ये एकूण ६९ रक्तदात्यांनी रक्तदान केले यामध्ये (११ मुली) (४६ मुले) आणि (१२ शिक्षकांनी) रक्तदान केले. हे शिबिर संपन्न करून घेण्यासाठी विभाग प्रमुख प्रा.एम.व्ही.चौगुले, अकॅडमिक इन्चार्ज प्रा.के.एस.नलवडे प्राध्यापिका राजश्री भंडारी, शिक्षक गजानन व्यवहारे, तसेच शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी रक्तपेढीचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. रक्तदान केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे संस्थापक सचिव, डॉ.बी.पी.रोंगे, अध्यक्ष एच.एम.बागल,उपाध्यक्ष बी.डी.रोंगे,खजिनदार दादासाहेब रोंगे,यांनी अभिनंदन केले.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com