लोटस इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आणि आय.सी.एम.एस. महाविद्यालय मध्ये ७५ वा प्रजासत्ताक दिन संपन्न
पंढरपूर तालुका प्रतिनिधी संपत लवटे
श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित, लोटस इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आणि आयसीएमएस महाविद्यालय मध्ये ७५ वा प्रजासत्ताक दिन संपन्न झाला.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून स्वेरी संस्थेचे मा.अध्यक्ष साल विठ्ठलसर ,उपस्थित होते. प्रमुख पाहुण्याचे स्वागत प्राचार्या डॉ.जयश्री भोसले यांनी केले.तर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार स्वाईप संस्थेचे अध्यक्ष एच.एम.बागल यांनी केला.यावेळी स्वाईप संस्थेचे उपाध्यक्ष बी.डी.रोंगे,उपस्थित होते.मॅनेजमेंट सदस्या सौ.वंदना रोंगे आणि दहावीच्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळालेली विद्यार्थिनी संध्या लेंडवे यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला.यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषणे केली तसेच देशभक्तीपर अनेक नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मार्च पास केले तर आय.सी.एम.एस महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर नृत्य सादर करून पाहुण्यांची व पालकांची मने जिंकली.कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत,व महाराष्ट्र गीताने,झाली तर सांगता वंदे मातरम या गीताने झाली. या कार्यक्रमासाठी ऐश्वर्या रोंगे मॅडम, ॲडव्होकेट घाडगे मॅडम आवर्जून उपस्थित होत्या.कार्यक्रम संपल्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते,विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, पालक,विद्यार्थी यांना संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे. अध्यक्ष.एच.एम.बागल उपाध्यक्ष बी.डी. रोंगे,खजिनदार दादासाहेब रोंगे यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com