द ह कवठेकर प्रशालेत इयत्ता दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
पंढरपूर प्रतिनिधी
एस एस सी मार्च 2024 परीक्षेसाठी प्रविष्ट प्रशालेतील विद्यार्थ्यांचा भावपूर्ण निरोप समारंभ प्रशालेत संपन्न झाला याप्रसंगी प्रशालेतील सर्व विद्यार्थी शिस्तीत व गणवेशात उपस्थित होते प्रारंभी सर्व वर्गांचे विषय शिक्षकांसह फोटो सेशन झालेकार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.व्ही. एम.कुलकर्णी सर यांनी केले याप्रसंगी आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असून पुढील सहा वर्षे ही आपल्या आयुष्यातील गोल्डन पिरियड असल्याने जास्तीत जास्त कष्ट करून यशस्वी होण्याचा मूलमंत्र त्यांनी दिला प्रांजली शेंडगे रिया दोशी , आरती होनकळस , सायली पवार, चिन्मयी कुलकर्णी, तनिष्का माने , सार्थक शिंदे, ओम चव्हाण, सार्थक रोंगे, वल्लभ आराध्ये व ईशान इरकल या विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
वर्गशिक्षक श्री दिवाण सर श्री काकडे सर सौ.अयाचित मॅडम व श्री एस एम कुलकर्णी सर यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा व शुभ आशीर्वाद दिले उपमुख्याध्यापक श्री आर जी केसकर सर यांनी आभार व्यक्त केले कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला याप्रसंगी पर्यवेक्षक श्री मुंढें सर ज्येष्ठ शिक्षक श्री पवार सर श्री आर एस कुलकर्णी सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.