आर्थिक

पंढरपूर तालुक्यातील शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी मा.आ.प्रशांत परिचारक

पंढरपूर प्रतिनिधी

दुष्काळजन्य परिस्थीतीला तोंड देत असलेल्या पंढरपूर तालुक्यात गेली दोन दिवसापासून अनेक गावांना अवकाळी पावसाचा व वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे केळी, डाळींब, आंबा आदी फळबागांचे व शेतकऱ्यांच्या घराचे, लाईट पोलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अगोदरच दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच पंढरपूर तालुक्यातील शेतकरी आपली पिके जगविण्यासाठी संघर्ष करीत होते.मात्र बुधवारी पंढरपूर तालुक्यातील नांदोरे, नेमतवाडी, पेहे, शेवते  आदी गावात वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या पाऊसामुळे व वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांना नामोहरम केले असून शेतीचे, फळबागांचे व घराचे  अतोनात नुकसान झाले आहे.

मागील काही दिवसापासून प्रतिकुल हवामानामुळे पिकांचे बाजारभाव घसरले आहेत. बाजारपेठेतील व्यापारी फिरकत नसल्याने बळीराजावर दुहेरी संकट ओढवले गेले, त्यातच केळी बाग चांगल्या बहरल्या असताना अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे.दरम्यान मा.आ.प्रशांत परिचारक यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून झालेल्या नुकसानाची माहिती घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा मोठा फटका बसून अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तरी या पिकांचे पंचनामे करून शासनाकडून शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळवून देण्यात यावी अशी मागणी मा.आ.प्रशांत परिचारक यांनी प्रशासनाकडे केली. यामुळे शेतकऱ्यामध्ये समाधानाचे वातावरण आहे.

*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!