शैक्षणिक

आय.सी.एम.एस.महाविद्यालयाची विद्यार्थिनी सायली कदम विद्यापीठात प्रथम

पंढरपूर प्रतिनिधी श्री संपत लवटे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन संचलित कॉलेज ऑफ आय.सी.एम.एस च्या यांच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षा सन मार्च /एप्रिल -२०२४ या परीक्षेमध्ये बी.सी.ए भाग -१(सञ -२) परीक्षेचा निकाल लागलेला असून या परीक्षे मध्ये स्वाईप संचलित इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट स्टडीज कासेगाव च्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यामध्ये बाजी मारून पुन्हा एकदा आय.सी.एम.एस महाविद्यालयाचे नाव उंचावले आहे. विद्यापीठामध्ये प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांची नावे खालीलप्रमाणे.१) कदम सायली श्रीनिवास – ९६.४२ % – विद्यापीठात प्रथम२) तपकिरे वैभवी महेश – ९४.००% विद्यापीठात द्वितीय३) भोसले तनुजा सोमनिंग ९३.९२% विद्यापीठात तृतीय क्रमांक मिळवून आय.सी.एम.एस कॉलेज ने निकालाच्या बाबतीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अव्वल राहण्याची परंपरा कायम राखली असून या गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे अध्यक्ष एच.एम.बागल व उपाध्यक्ष बी.डी.रोंगे खजिनदार दादासाहेब रोंगे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए. एस.माने यांनी अभिनंदन केले. कॅम्पस प्रमुख डॉ.जयश्री भोसले विभाग प्रमुख मुकुंद चौगुले,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,तसेच पालक वर्ग,विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!