उत्तर सोलापूर तालुका महसूल कर्मचारी नूतन संघटनेच्या सन २०२४-२५ च्या कार्यकारणी जाहीर सम्राट कोळी यांची अध्यक्षपदी निवड
दिनांक २७/१२/२०२४ रोजी पार पडलेल्या महसूल कर्मचारी संघटनाच्या बैठकीमध्ये उत्तर सोलापूर तालुका महसूल कर्मचारी नूतन संघटनेच्या सन २०२४-२५ च्या कार्यकारणी अध्यक्षपदी कामाशी प्रामाणिक व कार्यतत्पर विशेष ओळख आणि जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर मार्फत उत्कृष्ट महसूल सहाय्यक पुरस्कार प्राप्त श्री सम्राट कोळी यांची एक मताने निवड करण्यात आली व इतर सर्व नवीन पदाधिकारीची निवड करण्यात आलीया वेळी
श्री. निलेश पाटील तहसिलदार उत्तर सोलापूर, श्री. विठ्ठल जाधव महसूल नायब तहसीलदार, श्री. सुखदेव पाटील मंडळ अधिकारी, श्री. मल्लिनाथ लाकडे अव्वल कारकून, श्री. नामदेव गायकवाड अव्वल कारकून, श्री. सहदेव काळबेरे महसूल सहाय्यक, श्री. आशिष जाधव महसूल सहाय्यक, कु. क्षितिजा वाघमारे(डाटा ऑपरेटर) श्री नरेंद्र साळुंके उपस्थित होते