पंढरपूरात कृषी उडान विमानतळ लवकर व्हावे आमदार अभिजीत पाटील मागणी
पंढरपूर प्रतिनिधी
प्रतिनिधी- माढा विधानसभाचे आमदार अभिजीत पाटील यांनी विकास कामाचा झपाटा लावलेला दिसत आहे. निवडणुकीमध्ये दिलेल्या वचनाला जागत मतदार संघातील प्रश्नांचा उलगडा करत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच हिवाळी अधिवेशन नागपूर येथे मतदार संघातील ५५प्रश्नांचा उलगडा करत विधानसभेच्या पटलावर नेऊन ठेवला आहे. तसेच आज दिनांक ३०डिसेंबर रोजी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची मुंबई येथे भेट घेऊन पंढरपूर येथे केंद्रीय कृषी उडान योजना अंतर्गत विमानतळ व्हावे ही मागणी चे पत्र आमदार अभिजीत पाटील यांनी दिलेसोलापुर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पंढरपुराला दक्षिण काशी तर विठ्ठलाला महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणतात. विठ्ठलमंदिर अवघ्या महाराष्ट्राचे एक चिरंतन स्फूर्ती स्थान आहे. गोरगरिबांचा देव म्हणून श्री विठ्ठलाची ओळख आहे. पंढरपूरमध्ये वर्षातून चैत्री, आषाढी, माघी व कार्तिकी एकादशी निमित्त मोठ्या यात्रा भरतात..त्यातील दरवर्षी आषाढी एकादशीला लाखो भाविक येथे वारीसाठी व श्री विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. अशा या भारताची दक्षिण काशी समजल्या जाणार्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथे केंद्रीय ‘कृषी उडान योजना २.०’ या योजनेअंतर्गत विमानतळ असणे गरजेचे आहे. श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विमानतळ झाल्यास श्रीक्षेत्र शिर्डी प्रमाणे धार्मिक पर्यटन स्थळ असलेल्या पंढरपूरचाही विकास होईल. या विमान सेवेमुळे अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर इत्यादी तीर्थक्षेत्रांना भेट देणाऱ्या भाविकांसाठी गतिमान वाहतुकीची सुविधा उपलब्ध होईल. त्याशिवाय परदेशातील भाविकांची रिघ वाढेल, मागील काही वर्षात आषाढी वारीत परदेशी भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याने विमान सेवा सुरु झाली तर परदेशातील भाविकांसाठी सोयीचे ठरणार आहे.श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विमानतळ झाल्यास शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपर्यंत कमी वेळात आणि कमी खर्चात पोहोचवता येईल. शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन दूरच्या बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल आणि त्यांचे उत्पन्नात वाढ होईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना आर्थिक लाभासह त्यांच्या उत्पादनाला जगभरात ओळख मिळेल होईल असे आमदार अभिजीत पाटील म्हणाले आहेत.