पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये मकर संक्रांति निमित्त सर्व माता पालकांचा हळदीकुंकू समारंभ संपन्न.
पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचालित .
२४’मराठी न्यूज नेटवर्क
पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचालित पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये मकर संक्रांति निमित्त सर्व माता पालकांचा हळदीकुंकू समारंभ घेण्यात आला प्रमुख पाहुणे राजश्री गाडे नवरागेबालिका आश्रमच्या प्रमुख, मृणाली होरणे एम.बी. ए.पुणे येथे असणाऱ्या फॉरेन टूर्स करून आलेल्या ऍक्टिव्ह पर्सनॅलिटी तसेच सौ. माया सांगोलकर मॅडम , आदर्श बाल व प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.सुनीता मोहोळकर मॅडम उपस्थित होते याप्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन सर्व प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले
कार्यक्रमासाठी जवळजवळ शंभर महिला उपस्थित होत्या समारंभ अतिशय उत्साहात व विचारांच्या देवाणघेवाणीत पार पडला वाण म्हणून आपण ज्याप्रमाणे वस्तू देतो त्याचप्रमाणे चांगल्या विचारांची देवाणघेवाण व्हावी असे प्रतिपादन सौ माया सांगोलकर मॅडम यांनी केले
तसेच नवरंग बालक आश्रमाच्या प्रमुख सौ राजश्री गाडे मॅडम यांनी तसेच समूह कर मॅडम यांनी समाजातील विधवा तसेच घटस्फोटीत महिलांनाही या कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेण्याची जास्त गरज आहे
व त्यांनाच सर्वांच्या सहकार्याची जास्त गरज आहे असे प्रतिपादन केले सौ वृणाली होरणे यांनीही महिलांना महिलांनी स्वतःला कमजोर न समजता स्वतःमध्ये कॉन्फिडन्स निर्माण करून समाजामध्ये आपले स्थान निर्माण करावे असे मार्गदर्शन सर्व महिलांना केले समारंभ पार पाडण्यासाठी सौ . जगताप कविता शिंदे , शिंदे सविता सौ. दुरुक्कर श्रद्धा, सौ. बेणारे प्रार्थना ,सौ. पवार प्राजक्ता ,लिंबोळे मोनाली, गायकवाड मीनाक्षी ,सौ.शिंदे वैशाली, सौ. गायकवाड कोमल, राहुल शिंदे योगिता व क्रीडा शिक्षक श्री काळे राहुल यांनी सहकार्य केले.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७