जागृती विद्यामंदिर नेहरूनगर येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन सोहळा संपन्न.
२४’ मराठी न्यूज सोलापूर जिल्हा प्रतिनिधी जबर शिकलगर
नेहरूनगर सोलापूर येथील जागृती विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला नेहरूनगर सोलापूर येथे पंचायत समिती उत्तर सोलापूर व जागृती विद्यामंदिर नेहरूनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उत्तर सोलापूर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन उत्तर सोलापूर तालुका गटविकास अधिकारी सौ शितल बुलबुले यांच्या शुभहस्ते संपन्न झाले याप्रसंगी उत्तर सोलापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री बापूराव जमादार शिक्षण विस्तार अधिकारी श्री सिद्धेश्वर निम्बर्गी कुमठा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री सिद्राम वाघमोडे बाळे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री विठ्ठलसिंह रजपूत , देगाव केंद्रप्रमुख श्री दिगंबर कटकधोंड गट साधन केंद्र तथा तालुका विज्ञान विषय साधनव्यक्ती श्री चंद्रकांत वाघमारे प्राथमिक शिक्षक संघचे जिल्हा अध्यक्ष श्री म.ज.मोरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जागृती विद्या मंदिर चे प्राचार्य श्री विजयरत्न चव्हाण हे होते
याप्रसंगी उत्तर सोलापूर तालुक्यातील माध्यमिक विभागातून एकूण 32 शाळेने सहभाग नोंदविला तसेच प्राथमिक विभागातून 72 शाळेने सहभाग नोंदवला तसेच शिक्षक विभागातून तीन शिक्षक व एक प्रयोगशाळा सहायक, परिचर यांनी सहभाग नोंदविला कार्यक्रमाची सूत्रसंचालन प्रशालेच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती नलिनी राठोड मॅडम यांनी केले शेवटी आभार प्रशालेचे पर्यवेक्षक श्री म्हमाणे एम एल यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री नंदनगी जीबी, श्री वाय आर जाधव, श्री हालोळी एस जी श्री पवार व्ही बी व प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व उत्तर सोलापूर बीआरसी मधील विषय साधनव्यक्ती, विशेष तज्ञ, विशेष शिक्षक यांनी परिश्रम घेतले.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७