नवीन शैक्षणिक धोरण व अनुवाद’ या विषयावरती ‘कर्मवीर स्वायत्त’ मध्ये राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन.
कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर
२४’ मराठी न्यूज नेटवर्क
पंढरपूर – ‘रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात हिंदी व इंग्रजी विभागाच्या वतीने रुसा कॉम्पोनंट आठ अंर्तगत दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन दि. २० व २१ जानेवारी२०२३ रोजी केले असून ‘नवीन शैक्षणिक धोरण व अनुवाद’ या विषयावरती देशभरातून वेगवेगळे विचारवंत उपस्थित राहून विचारमंथन करणार आहेत. यावरचा सत्रासाठी देशभरातून विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आजच्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने नवीन शैक्षणिक धोरण व रोजगाराची संधी, पट कथालेखन, अनुवादाचे महत्त्व, कौशल्य विकास, नवीन शैक्षणिक धोरणाचा हिंदी व इंग्रजी भाषेवर होणारा परिणाम तसेच नवीन शैक्षणिक धोरण वजागतिकीकरण या विषयावरती मंथन केले जाणार आहे.
या चर्चासत्रामध्ये देशातून जवळजवळ दोनशे लोक सहभागनोंदवतील . या चर्चासत्राचा फायदा नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे. असा विश्वास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रकांत खिलारे यांनी व्यक्त केला आहे. सदर चर्चासत्रा मध्ये डॉ. गिरीश पवार हैद्राबाद, डॉ. शिवाजी सरगर मुंबई, डॉ. अशोक हुलीबंदी कर्नाटक, डॉ. सदानंद भोसले पुणे, डॉ. बाळासाहेब सोनवणे पुणे, डॉ. सुनील देवधर पुणे, डॉ. प्रकाश कोपार्डे परळी वैजीनाथ, डॉ. तिकम शेखावत पुणे, डॉ. दत्तात्रय मुरुमकर मुंबई, व डॉ. भीम सिंग हैद्राबाद हे विचारवंत सहभागी होणार असून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. या चर्चासत्रा मध्ये देशभरातूनसंशोधकांकडून त्यांचे संशोधन लेख मागविण्यात आले असून यु.जी.सी. केअर लिस्टेड जर्नल मध्ये सदर लेख प्रकाशित केले जाणार आहेत. अशी माहितीनिमंत्रक सौ. डॉ. फैमिदा बिजापुरे व प्रा. डॉ. समाधान माने यांनी दिली……………………………………………………………………………………………………………………………………………
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७