२४ मराठी न्यूज पंढरपूर श्री नंदकुमार देशपांडे
पंढरपूर, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून पात्र रेशन कार्डधारकांना वर्षभर मोफत धान्य उपलब्ध होणार असून या अंतर्गत पंढरपूर तालुक्यातील १ लाख ५२ हजार ७२७ नागरिकांना जानेवारीपासून मोफत धान्य “वितरण केले जात आहे. यासाठी महिन्याला तालुक्यात सुमारे ३५३ टन गहू व ५१६ टन तांदूळ असे एकत्रित ८६९ टन धान्य लागणार असल्याची माहिती तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी दिली.पंढरपूर तालुक्यात ग्रामीणमध्ये ११६ तर शहरात ३० असे एकूण १४६ रेशन दुकान आहेत. अंत्योदय योजनेत ५ हजार ७१३ कार्डधारक असून २१ हजार ५०६ लोकसंख्या आहे. तर अन्नसुरक्षा योजनेत ३२ हजार ७०१ कार्डधारक असून १ लाख ३१ हजार २२१ लोकसंख्या आहे. राष्ट्रीय अधिनियम २०१३अंतर्गत अंत्योदय कार्डधारकास प्रतिकार्ड १५ किलो गहू २ रुपये किलो दराने व २० किलो तांदूळ ३ रुपये किलो दराने दिले जात होते. तसेच अन्नसुरक्षा योजनेत प्रतिव्यक्ती २ किलो गहू २ रुपये दराने व ३ किलो तांदूळ ३ रुपये किलो दराने दिले जात होते. जानेवारी २०२३ पासून अंत्योदय योजनेतील प्रत्येक कार्डधारकाला १५ किलो गहू, २० किलो तांदूळ मोफत दिले जाणार आहेत. तर अन्नसुरक्षा योजनेत प्रतिव्यक्ती २. किलो गहू व ३ किलो तांदूळ मोफत मिळणार आहे.तालुक्यातील सर्व रेशन दुकानदारांकडून या योजनेतील नागरिकांना योग्य या धान्याचे पध्दतीने वाटप केले जाणार आहे. या योजनेतील कार्ड धारकांनी पैसे देऊ नयेत तसेच कोणी पैशाची मागणी केल्यास तत्काळ अन्नधान्य पुरवठा विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही तहसीलदार बेल्हेकर यांनी केले आहे.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७