प्रा.डॉ.दत्तात्रय काळेल यांची विद्यापीठाच्या अभ्यासक्रम मंडळावर निवड.
24 मराठी न्यूज नेटवर्क
यांची नुकतीच अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर या विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळावरती कुलगुरू नियुक्त सदस्य म्हणून निवड झाली आहे.त्यांनी एम फिल ही पदवी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील ग्रामीण नेतृत्वाचा एक अभ्यास यावरती मिळवली आहे, तसेच पीएच. डी ही पदवी शरद पवार आणि महाराष्ट्रातील पुरोगामी लोकशाही दलाचे शासन एक चिकित्सक अभ्यास यावरती मिळवलेली आहे. ते विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत,महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत, त्याचबरोबर रयत सेवक संघ सातारा कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य या संघटनेचे खजिनदार आहेत. त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला असून तसेच कोल्हापूरचा सत्यशोधक पुरस्कारही मिळालेला आहे, जन मंगल सामाजिक संस्थेचा जीवन गौरव पुरस्कारही मिळालेला आहे. या सर्व यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत असून सध्या प्रा. डॉ. दत्तात्रय काळेल हे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय स्वायत्त पंढरपूर येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७