सोलापूर : महामार्गावरील उड्डाण पुलावरून कोसळून १२ काळविटांचा दुर्दैवी मृत्यू.
24 मराठी न्यूज सोलापूर जिल्हा प्रतिनिधी श्री प्रकाश इंगोले
सोलापूर -विजापूर बायपास रोडवरील देगाव-देशमुख वसती येथील उड्डाण पुलावरून खाली कोसळून १२ काळविटांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे
यातील तीन काळवीट जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून रस्ते अपघातात अनेक वन्यजीव मृत्युमुखी पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. महामार्गावर जाणाऱ्या सुसाट गाड्यांखाली उदमांजर (सिवेट), सर्प, काळवीट, लांडगे, कोल्हे व इतर पक्षी इ. वन्यजीव गाड्यांखाली चिरडून मरण पावल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. महामार्ग दुतर्फा मोठे झाल्यामुळे गाड्यांचा वेग वाढला आणि रोडकिलचे प्रमाण वाढत चालले आहे. मागच्या वर्षी याच देशमुख वस्तीजवळील सोलापूर-विजापूर बायपास महामार्गावर दोन काळवीटांचा रस्ता ओलांडताना पुलावरून पडून मृत्यू झाला होता. आता देखील याच ठिकाणी ही घटना घडली आहे. मागील दोन वर्षातील ही सलग तिसरी दुर्दैवी घटना घडल्यामुळे पर्यावरणप्रेमींतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७