संत रोहिदास महाराजांचे विचार समाजाने आचरणात आणले पाहिजेत : – प्रमोद घोडके .
24 मराठी न्यूज,मोहोळ तालुका प्रतिनिधी : राजेश शिंदे .
संत रोहिदास महाराज यांनी जे विचार सांगितले आहेत ते खऱ्या अर्थाने आज आचरणात आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन चर्मकार समाजाचे नेते प्रमोद घोडके यांनी लक्ष्मी दहिवडी येथे जयंती निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान बोलताना केले . ते पुढे बोलताना म्हणाले की , समाजात वावरत असताना समाजातील लोकांनी संत रोहिदास महाराज यांचे जे विचार होते ते रुजविण्याचे काम केले पाहिजे . समाजातील एखादी व्यक्ती मोठया पदावर नोकरी करीत असताना आपल्या समाजातील लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मदतीचा हात दिला पाहिजे ,तरच आपला समाज सुधारण्यासाठी मदत होणार आहे . यावेळी माजी तालुकाध्यक्ष विलास गवळी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले . चर्मकार समाजाचे दैवत संत रोहिदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी नवीन समाज मंदिर बांधलेल्या ठिकाणी श्री संत रोहिदास महाराज यांचे मूर्तीची पूजा करण्यात आली . याप्रसंगी आबा वाघमोडे , दादा टोके , तानाजी गवळी , धनाजी कांबळे , अमोल कांबळे , प्रमोद भगत , राहुल कांबळे , औदुंबर सुरवसे , रावसाहेब पवार , सागर कांबळे , बाळासाहेब कांबळे , विवेकानंद कांबळे , मसाजी कांबळे यांचेसह महिला व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७*